Download App

Shilpa Shetty: ‘सुखी’ मध्ये शिल्पाच्या अभिनयाने प्रेक्षकांना केलं थक्क

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे कायम जोरदार चर्चेत येत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. (Social media) या सिनेमाला तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच शिल्पा शेट्टी कुंद्रा कायम तिच्या ग्लॅमरस अंदाजात बघायला मिळते फक्त फॅशन नाही त्या पलीकडे जाऊन अभिनयाचं करिष्मा ती कायम दाखवते. सुखी मधून पुन्हा एकदा शिल्पाने आपल्या प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.


प्रत्येक स्त्रीमध्ये लपलेल्या “सुखी” ची गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि शिल्पाने रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा आपली छाप सोडून दिली. बॉलीवूड दिवा असलेल्या शिल्पा ने “सुखी” चित्रपटातील तिच्या उल्लेखनीय अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे.’सुखी’ मध्ये शिल्पा शेट्टी कुंद्राने एक व्यक्तिरेखा साकारली आहे, जी स्वतःच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करते. ती तिच्या व्यक्तिरेखेच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये अखंडपणे पार पाडते. भावनेची खोली दाखवते, जी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

शिल्पाचा आगामी ‘सुखी’ हा चित्रपटामध्ये एका 38 वर्षीय पंजाबी गृहीणी सुखी म्हणजे कारला आणि तिच्या मैत्रिणींची कथा सांगणारा चित्रपट आहे. कारला आणि तिच्या मैत्रिणी 20 वर्षांनंतर शाळेच्या रियुनियनसाठी दिल्लीला जातात. त्यावेळी त्यांच्या भावविश्वातील गुढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे चाळीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या स्त्रीयांच्या आयुष्यातील उलथापालथी त्यात पाहायला मिळाली आहे.

Chandramukhi 2 Hindi Trailer Out: कंगनाचा ‘चंद्रमुखी 2’ मधील रौद्रावतार पाहिलात का?

‘सुखी’ हा सोनल जोशी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा यांचा समावेश असलेल्या पॉवरहाऊस टीमने निर्मिती केली आहे. मुख्य भूमिकेत शिल्पा शेट्टी कुंद्रा व्यतिरिक्त, चित्रपटात अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार, कुशा कपिला यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसह अपवादात्मक कलाकारांचा देखील समावेश आहे, ज्यामुळे उत्कृष्ट कामगिरीने भरलेला सिनेमॅटिक अनुभव सुनिश्चित होतो. शिल्पा शेट्टी कुंद्राच्या आगामी प्रकल्पांमध्ये रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ मधील पहिल्या महिला पोलिसाच्या भूमिकेत आणि ‘KD’ नावाचा आतुरतेने प्रतीक्षेत असलेला कन्नड चित्रपट, या दोन्ही गोष्टी तिच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा निर्माण करत आहे.

Tags

follow us