Download App

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्कर विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे.

स्वरा भास्करने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘काहीवेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेल्या एखाद्या गोष्टीसाठी दूर-दूरपर्यंत शोधता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली. आणि मग आम्ही एकमेकांना शोधले. माझ्या हृदयात स्वागत आहे. फहाद अहेम हे थोडे गोंधळलेले आहे. पण ते तुमचे आहे! स्वरा भास्करने या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा संपूर्ण प्रवास दिसत आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.’

Upcoming Film : कार्तिक आर्यनचा शहजादाची तब्बल 8 कोटींपेक्षा अधिक प्री बुकिंग

फहाद अहमद हे समाजवादी पक्षाशी संबंधित असून ते समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र शाखेशी संबंधित आहेत. स्वरा भास्कर शेवटची ‘जहाँ चार यार’ या चित्रपटात दिसली होती, जो सप्टेंबर 2022 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. स्वरा भास्करला निल बट्टे सन्नाटा आणि तनु वेड्स मनू या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखले जाते.

Tags

follow us