Titiksha Tawde: मराठी अभिनेत्रीने पहिल्या प्रपोजचा केला गौप्यस्फोट; म्हणाली, “त्याने माझी छेड काढली…”

Titiksha Tawde: कलाकारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक राहत असतात. (social media) कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून किंवा अनेक मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी देखीलचाहत्यांना शेअर करत असतात. आता अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) हिने एक मजेशीर किस्सावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.   View […]

Titiksha Tawde

Titiksha Tawde

Titiksha Tawde: कलाकारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक राहत असतात. (social media) कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून किंवा अनेक मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी देखीलचाहत्यांना शेअर करत असतात. आता अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) हिने एक मजेशीर किस्सावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.


तसेच अभिनेत्री तितिक्षा तावडे सध्या ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या सिरीयलमधून चाहत्यांना भेटीला येत आहे. या सिरीयलमुळे तिला नवी ओळख मिळाली आहे. याबरोबरच तिचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तिने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी एका मुलाने तिला त्याच्यासोबत कॉफी प्यायला येण्यासाठी विचारलं होतं आणि त्यावर ती तिथेच जोरजोरात रडायला लागली असं तिने सांगितले आहे.

पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगत तितिक्षा म्हणाली की, मी मुंबई सोडून गोव्याला शिक्षणासाठी गेले आणि तेव्हा पहिल्यांदा घरच्यांपासून वेगळी राहत होते. तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील एका सीनियरने कॉफी डेटसाठी विचारले होते. एकदा तो मला मेसमध्ये भेटला आणि मला म्हणाला की मला भेट, मला तुझ्याशी थोडं बोलायच आहे. मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये संध्याकाळी त्याला भेटले. तेव्हा त्याने मला विचारले की तुला माझ्यासोबत कॉफी प्यायला यायला आवडेल का? त्यावर मी तिथेच अक्षरशः भोकाड पसरले असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

तसेच पुढे ती म्हणाली की, मला रडत अस्ल्याचे बघून आमच्या कॉलेजमधील काही सीनियर मुली माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारले की तो तुला त्रास देत आहे का? त्यावर मी त्यांना म्हणाले होते की नाही. तो मला त्रास देत नाही, परंतु त्याने मला कॉफीसाठी विचारले आहे. त्या क्षणी त्याने माझी छेड काढल्यासारखे मला वाटलं होते. कारण मुंबईत मी घरच्यांसोबत खूप सुरक्षित होते आणि इथे थेट त्याने मला कॉफीसाठी विचारणं हा माझ्यासाठी कल्चरल खूपच धक्कादायक होता. त्या मुलानेही मला नंतर सॉरी म्हटले. परंतु आता तितिक्षाचं हे बोलणं खूप चर्चेत आले आहे.

Exit mobile version