Adinath Kothare’s film Paani won 7 awards : आदिनाथ कोठारेच्या (Adinath Kothare) ‘पाणी ‘ चित्रपटाने (Paani Movie) सात पुरस्कार पटकावल्याचं समोर आलंय. तो झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल (Zee Chitr Gaurav Awards) ठरलाय. पहिलं दिग्दर्शन आणि तब्बल 7 पुरस्कार आदिनाथ कोठारेच्या पाणी चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात खास मोहर उमटवली आहे.
अचानक अशक्तपणा अन् जुलाबाचा त्रास; पुण्यात जीबीएसने आणखी दोघांचा बळी!
अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट ‘पाणी’ने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल 7 पुरस्कार (Entertainment News) जिंकले आहेत. पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल ठरला आहे. पाणी ची गोष्ट ही खास ठरली. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य (Marathi Movie) गाजवून गेली. पाणीमध्ये आदिनाथने दुहेरी भूमिका साकारून उत्तम काम तर केलं, पण अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये पाणीने विशेष कौतुक मिळवलं.
डोनाल्ड ट्रम्प यांचा 11 लाख कोटींवर डोळा.. भारताला तेल देण्याची अमेरिकेला घाई
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात पाणी ने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन (अनमोल भावे) सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित) सर्वोत्कृष्ट गीत (पाणी टायटल ट्रॅक आणि नाचनारा) आदिनाथ कोठारे आणि मनोज यादव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गुलराज सिंग) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (आदिनाथ कोठारे) सर्वोत्कृष्ट चित्रपट ( पाणी ) असे तब्बल 7 पुरस्कार पटकावले आहेत.
मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ कायम प्रयोगशील भूमिका आणि तितकच खास दिग्दर्शन करताना दिसतो. येणाऱ्या काळात आदिनाथ अजून एका नव्या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. सोबतच तो वेगवेगळ्या भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.