Adipurush Controversy: अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने सिनेमातील काही डायलॉग्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमातील कोणकोणते डायलॉग्स बदलण्यात आले आहेत? याबाबत जाणून घेणार आहोत.
https://twitter.com/jBhhVj1/status/1671207616708755456?s=20
‘कपड़ा तेरे बाप का…तो जलेगी भी तेरे बाप की’ या आदिपुरुष सिनेमामधील हनुमानाच्या डायलॉगवर अनेक चाहत्यांनी टीका केली आहे. आता हा डायलॉग बदलण्यात आला आहे. तसेच सिनेमामधील इतर काही डायलॉग देखील बदलण्यात आले आहे.
‘तू अंदर कैसे घुसा, तू जानता भी है कौन हूं मैं’ हा डायलॉग बदलून ‘तुम अंदर कैसे घुसे, तुम जानते भी हो कौन हूं मैं’ असा करण्यात आला आहे. ‘कपड़ा तेरे बाप का…तो जलेगी भी तेरे बाप की’ हा आदिपुरुष सिनेमातील बजरंगबलीचा डायलॉग बदलून ‘कपडा तेरी लंका का …तो जलेगी भी तेरी लंका’ असा करण्यात आला आहे.
‘जो हमारी बहनों…उनकी लंका लगा देंगे’ हा डायलॉग बदलून ‘जो हमारी बहनों…उनकी लंका में आग लगा देंगे’. असा करण्यात आला आहे. ‘मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया’ हा आदिपुरुष सिनेमातील डायलॉग बदलून ‘मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को समाप्त कर दिया’ असा करण्यात आला आहे.
International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral
आदिपुरुष सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं. सिनेमातील हनुमानाच्या आधीच्या डायलॉगबाबत मनोज यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘आजकालचे लोक या डायलॉगबरोबर जोडले जावेत म्हणून जाणूनबुजून तो डायलॉग तसा लिहिला आहे. ही गोष्ट सामान्य भाषेत सांगितली आहे.फक्त बजरंगबलीबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेच्या डायलॉगबद्दल देखील बोललं गेलं पाहिजे.
अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली ‘आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या सिनेमात सीता ही भूमिका साकारली आहे. अभिनेता देवदत्त नागेनं या सिनेमात बजरंगबलीची भूमिका साकारली आहे.