Download App

Adipurush Released: ‘आदिपुरुष’वर टीका करणाऱ्या प्रेक्षकाला चाहत्याने धू धू धूतले, Video Viral

Adipurush Released : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. आदिपुरुषबाबत चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Adipurush Released) ज्यात दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचे दिसून येत आहे. प्रभासचे चाहते आणि सिनेमा न आवडणारे प्रेक्षक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. याचे रुपांतर नंतर मारामारीत देखील झाले आहे.

हा व्हिडिओ साऊथचा असून सध्या सोशल मीडियावर (Social media) फिरत आहे. ‘आदिपुरुष’ आज देशभरात रिलीज झाला. रामायणावर आधारित या सिनेमात व्हीएफएक्स हे आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं. मात्र सिनेमात व्हीएफएक्सच गंडलं असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. तसेच सैफचा लुक आणि अभिनयही फारसा आवडला नसल्याचा अनेकांचा सूर होता.

दरम्यान हैदराबाद येथील एका थिएटरबाहेर प्रेक्षक सिनेमावर प्रतिक्रिया देत होते. यावर एकजण सिनेमा आवडला नसल्याचं सांगत होता तोच तिकडून प्रभासचा चाहता भडकला अन् या भांडणात दोन गटच तयार झाले आणि प्रकरण मारामारीपर्यंत झाले आहे. चाहत्यांनी त्या प्रेक्षकाला पाठीत बुक्के घालून धु धु धुतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

अनेकांना आदिपुरुष फारसा आवडला नाही. बरेच जण सोशल मीडियावर सिनेमाला ट्रोलही करत आहेत. यातील सैफचा लुकही नापसंत केला जातोय. एकंदर 500 कोटी रुपये खर्च करुन बनवलेल्या या सिनेमाने अनेकांना निराश केलंय. तर दुसरीकडे काही जण सिनेमाचं कौतुकही करत आहेत. आता तुम्हाला कसा वाटतोय ‘आदिपुरुष’ थिएटरमध्ये जाऊनच कळेल.

Tags

follow us