Adipurush : संस्कृतीच्या नावावर हे काय? ‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरवर चाहते नाराज

Adipurush New Poster : प्रभू श्रीराम (Jai Sri Ram), त्यांचा जीवनप्रवास आणि संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी जगासमोर पुढे ठेवलेल आदर्श या सर्वांचा विसर भारतीयांना कधी पडू शकत नाही. रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या दाखवण्यात आले आहे. अनेक कलाकारांनी अतिशय सहजपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. यामध्ये (Arun Govil) अरुण गोविल […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 30T120322.303

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 30T120322.303

Adipurush New Poster : प्रभू श्रीराम (Jai Sri Ram), त्यांचा जीवनप्रवास आणि संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी जगासमोर पुढे ठेवलेल आदर्श या सर्वांचा विसर भारतीयांना कधी पडू शकत नाही. रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या दाखवण्यात आले आहे. अनेक कलाकारांनी अतिशय सहजपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. यामध्ये (Arun Govil) अरुण गोविल यांनी साकारलेले श्रीराम म्हणजे जणू देवाचं रुपच दाखवलं जायच, अशीच प्रतीमा प्रेक्षकांमध्ये तयार झाली.

परंतु सध्या श्रीरामांचं एक वेगळं रुप प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. (South Films ) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वात टॉपवर गाजत असणारा अभिनेता प्रभास (Prabhas) आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush ) या चित्रपटात श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

राम नवमी (ram navami 2023) च्या निमित्तानं या चित्रपटाचे एक नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मंत्रों से बढ़के तेरा नाम…. जय श्री राम’ असं या पोस्टरच्या खाली कॅप्शन लिहित प्रभासनं हे पोस्टर शेअर केलं.

Mahesh Kale : ‘हा तर रेहमानच्या जीवावर उठलाय’; नेटकऱ्यांकडून महेश काळे ट्रोल

क्षणातच या पोस्टरची चर्चा
चित्रपटाच्या पोस्टरवर रामाच्या रुपात प्रभास, सीतेच्या रुपात क्रिती सेनन, लक्ष्मणाच्या रुपात सनी सिंग आणि रामभक्त हनुमानाच्या रुपात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. आपण पुराणकथांमध्ये राम- लक्ष्मण- सीता आणि मारुतीरायाची जी वर्णनं बघितली आणि ऐकली त्याच्या बरंच जवळ जाणारं हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पण, काही प्रेक्षकांना मात्र ते नसल्याचे सांगण्यात येत आहे, या पोस्टरवरून संस्कृतीच्या नावावर हे काय? अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version