Download App

Adipurush Movie Released : ‘आदिपुरुष’चा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहायला जाताय? तिकिटाची किंमत ऐकून अंगावर येईल काटा

Adipurush Movie Released : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Adipurush Tickets Price) रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग एक लाखाहून जास्त तिकीटांची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

https://twitter.com/rajeshnair06/status/1669540310765158401?s=20

पहिल्या दिवशी अनेक शो हाऊसफुल्ल चालले आहेत. त्याच वेळी, दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. आदिपुरुषची तिकिटे प्रीमियम थिएटरमध्ये 2,000 रुपयांपर्यंत विकली जात आहेत.

‘आदिपुरुष’ हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तब्बल ६ हजार २०० स्क्रीन्सवर २ डी आणि ३ डीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याचे समोर आलं आहे. जगभरात सिनेप्रेमी आता हा चित्रपट बघण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. फर्स्ट डे फर्स्ट अनेक सिनेमागृह हाऊसफुल्ल झाले आहेत.

यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये उत्तम क्रेझ दिसून येत आहे. ढोल-ताशांचा गजरात चाहते देखील ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे स्वागत करत आहेत. अनेक ठिकाणी शाळेतल्या मुलांना ‘आदिपुरुष’ चित्रपट दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत एक शिक्षिका हनुमानाची मूर्ती घेऊन चित्रपटगृहात एन्ट्री करत आहे, नंतर ती एका खूर्चीवर ती मूर्ती ठेवत आहे.  तर दुसऱ्या चित्रपटगृहात ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाच्या दरम्यान माकडानेच एन्ट्री घेतली आहे. एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केले आहे कि की,”आदिपुरुषच्या भव्य प्रकाशनासाठी हनुमानजी स्वत: आले आणि आशीर्वाद दिला आहे”.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. परंतु वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली होती. ‘आदिपुरुष’ हा रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. मराठमोळा ओम राऊतने (Om Raut) या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास (Prabhas) रामाच्या आणि कृती सेनन (Kriti Sanon) सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या, सनी सिंह लक्ष्मणाच्या आणि मराठमोळा देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सोनल चौहान आणि तृप्ती तोरदमल देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असल्याची  झाली आहे.

Tags

follow us