Aditya Narayan : आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण

Aditya Narayan Social Media Break : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) कायम चर्चेत असतो. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची मोठी ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. ( Instagram Post) एक खास पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.   View this post on […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 12T155650.449

Aditya Narayan

Aditya Narayan Social Media Break : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) कायम चर्चेत असतो. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची मोठी ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. ( Instagram Post) एक खास पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.


आदित्यने गेल्या ३ महिन्यांसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याने सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. आदित्यने एक खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची माहिती केली आहे. त्याने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

माझ्याविषयी काही अफवा येण्याअगोदरच मी चाहत्यांना सांगू इच्छितो की मी ठीक आहे, सध्या मी सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेणार आहे. आता मला माझ्या कन्येसोबत, बायको आणि आई- वडिलांबरोबर जास्तीत जास्त घालवायचा आहे. तसेच ‘सांसें’ या माझ्या पहिल्या अल्बमवर देखील सध्या मी जोर देणार आहे.


या’ कारणाने हटवल्या पोस्ट

आदित्य नारायणने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याबरोबरच सर्व पोस्टदेखील हटवले आहेत. याविषयी बोलताना तो म्हणाला की,”माझं सोशल मीडिया प्रोफाइल एका कॅनव्हास प्रमाणे आहे. त्यामुळे नवी सुरुवात करण्याअगोदरच आधीच्या सर्व पोस्ट, फोटो मी डिलीट केले आहेत. आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती त्याने यावेळी दिली आहे.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

३ महिन्यांनी करणार कमबॅक

आदित्यने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तो ३ महिन्यांनी कमबॅक करत असल्याचे देखील सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे,”नवं काहीतरी शिकण्याकरिता आता मी सज्ज आहे. मला वाटतं सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा रिअलिस्टिक जगात जास्तीत जास्त वेळ घालवा लागणार आहे. जुलैमध्ये लवकरच भेटू”.

Exit mobile version