पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता” मराठी झी 5 वर लवकरच होणार प्रदर्शित !

नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रभावी मराठी ओरिजिनल्समध्ये 'अडकित्ता'ची भर पडणार आहे.

Untitled Design   2026 09 02T190332.897

Untitled Design 2026 09 02T190332.897

“Adkitta” is coming soon to Zee5! : खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5 नेहमीच प्रेक्षकांना नवनवीन कलाकृतीची ओळख करून देत असतो. अश्यातच आगामी “अडकित्ता” चित्रपटाचा प्रीमियर 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रभावी मराठी ओरिजिनल्समध्ये ‘अडकित्ता’ची भर पडणार आहे. पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्यातील गुंतागुंत मांडणारी उत्कंठावर्धक आणि भावनिक कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणण्यात येणार आहे.

आशुतोष परांडकर दिग्दर्शित आणि मंगेश पवार अँड कंपनी व जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित ‘अडकित्ता’ हा कुटुंबातील नातेसंबंध, काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल तसेच दुसऱ्याची काळजी घेण्याची जबाबदारी यांमधील भावनिक गुंतागुंतीचा वेध घेणारा कौटुंबिक चित्रपट आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात उत्तम कलाकारांना एका हळुवार आणि भावस्पर्शी कथेसाठी एकत्र आणण्यात आले आहे. रोजच्या जीवनातील अनुभव मांडणाऱ्या कथानकाला भावनांची खोली देणाऱ्या ‘अडकित्ता’मधून मानवी भावनांशी घट्ट नाते राखत प्रेक्षकांना विचार करायला आणि चर्चा करायला प्रवृत्त करणाऱ्या वेगळ्या कथा सादर करण्याची मराठी झी5ची वचनबद्धता आणखी मजबूत करण्यात आली आहे.

राम मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय! नवे CEO म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रांची नियुक्ती

“अडकित्ता” ची कथा काय आहे?

गौतम आणि कस्तुरी हे आनंदी आणि स्वतंत्र विचारांचे जोडपे आहे. आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत त्यांनी आपल्या मूळ गावापासून दूर सुखाचे आयुष्य उभे केले आहे. मात्र मूल होऊ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते. कठीण गर्भावस्थेनंतर त्यांचा मुलगा ओंकारचा मुदतपूर्व जन्म होतो. त्यानंतर एकीकडे पालकत्वाची आव्हाने सांभाळताना दुसरीकडे आपले व्यावसायिक आयुष्यही सुरळीत ठेवण्याची कसरत या दोघांना करावी लागते. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि करिअर यांचा मेळ घालणे कठीण होऊ लागल्यानंतर ओंकारची काळजी घेण्यासाठी हे जोडपे मंगल नावाच्या नॅनीची मदत घेते.

सुरुवातीला नव्याने आलेल्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना मंगलचा मोठा आधार मिळतो. मात्र कस्तुरी आणि गौतम तिच्यावर अधिकाधिक अवलंबून राहू लागतात, तशी त्यांच्या घरातील परिस्थितीही बदलू लागते. हळूहळू त्यांच्या निर्णयांवर, दैनंदिन सवयींवर आणि घरातील कारभारावर मंगलचा प्रभाव वाढू लागतो. अखेर तिची उपस्थिती मदत म्हणून कमी आणि नियंत्रण म्हणून अधिक जाणवू लागते. मदतीची गरज असलेल्या एका तरुण जोडप्याची साधी वाटणारी ही कथा पुढे विश्वास, परावलंबित्व आणि कुटुंब व घरातील नात्यांच्या मर्यादा यांचा वेध घेणारी उत्कंठावर्धक कथा होते.

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवर MPSC अध्यक्षांचा खुलासा; ‘घटना माझ्या पदभारापूर्वीची’

‘अडकित्ता’ च वेगळेपण

आधुनिक काळातील पालकत्वाचा आनंद आणि त्यातील आव्हाने मांडणारी, आपल्या आयुष्याशी नाते सांगणारी कथा. प्रसंगानुरूप घडणाऱ्या घटना, भावनिक नाट्य, कौटुंबिक नातेसंबंध आणि मानवी नाती यांचा वेगळा मिलाफ. व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधताना दररोज करावी लागणारी कसरत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांचा भूमिकांमधील बारकावे दाखवणारा अभिनय. सहानुभूती, समजूतदारपणा, क्षमा आणि आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आपण घेत असलेले निर्णय यांचा वेध. गोंधळ आणि धावपळीच्या प्रसंगांतही विनोद आणि नात्यांमधील जिव्हाळा शोधणारी एक हृदयस्पर्शी कथा.

चित्रपटा विषयी बोलताना मंगलची भूमिका साकारणारी सई ताम्हणकर सांगते “गौतम आणि कस्तुरीच्या आयुष्यात अगदी अनपेक्षित वेळी मंगलचा प्रवेश होतो आणि हळूहळू ती त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होते. वरवर दिसते त्यापेक्षा मंगलच्या व्यक्तिमत्त्वात बरेच काही दडलेले आहे आणि तिच्या भूमिकेतील हीच गोष्ट मला विशेष रंजक वाटली. वेगवेगळे विचार आणि स्वभाव असलेली माणसे प्रेमाच्या एका समान धाग्यामुळे अखेर एकाच भूमिकेवर कशी येऊ शकतात, हे ‘अडकित्ता’मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले आहे”

मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द; कारण काय?

गौतमची भूमिका साकारणारा सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “आपले आयुष्य कसे जगायचे, हे आपण पूर्णपणे ठरवले आहे, असे गौतमला वाटत असते. मात्र पालकत्वामुळे त्याचे सगळेच गणित बदलते. मला ही व्यक्तिरेखा जवळची वाटली, कारण त्याचा गोंधळ आणि त्याची धडपड ही आपल्या सर्वांच्या परिचयाच्या परिस्थितीतून निर्माण होते. एकीकडे त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे, तर दुसरीकडे स्वतःचे करिअरही घडवायचे आहे. ‘अडकित्ता’मध्ये या परिस्थिती विनोद आणि जिव्हाळ्याने मांडण्यात आल्या आहेत, पण त्यामागे एक भावनिक प्रवासही आहे. आपण आयुष्यात घेत असलेले निर्णय, निभावत असलेल्या भूमिका आणि या दोन्हींत समतोल कसा साधायचा, याबद्दल गौतम आणि कस्तुरीचा प्रवास प्रेक्षकांमध्ये चर्चा घडवून आणेल, अशी मला आशा आहे.”

कस्तुरीची भूमिका साकारणारी सखी गोखले म्हणाली, “कस्तुरी ही शहरात राहणारी स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. विभक्त कुटुंबात नव्याने आलेले मातृत्व सांभाळताना ती आपल्या महत्त्वाकांक्षाही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा संघर्ष अनेकांच्या आयुष्यात दिसतो, मात्र त्याबद्दल फारसे बोलले जात नाही. त्यामुळे ‘अडकित्ता’ची कथा आणि कस्तुरीची व्यक्तिरेखा अनेकांना आपल्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटेल. आपल्या सर्वांना दररोज ज्या गुंतागुंतीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो, त्यांचा सखोल वेध घेतानाच ‘अडकित्ता’ आपल्या आयुष्याचे प्रतिबिंबही दाखवतो.” ‘अडकित्ता’ 11 सप्टेंबर 2026 रोजी केवळ मराठी झी5वर बघायला विसरू नका !

Exit mobile version