Advance bookings for ‘Dhurandhar: The Revenge’ begin : Jio Studios आणि B62 Studios यांच्या बहुप्रतीक्षित धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग आजपासून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सुरू झाली आहे. ट्रेड एक्स्पर्ट्सच्या मते, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतच्या मोठ्या ओपनिंगपैकी एक देऊ शकतो. मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन, रोमांचक ड्रामा आणि जासूसी कथानकाचा थरार अनुभव देण्याचे आश्वासन देतो. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असून ही स्पाय-अॅक्शन थ्रिलर सूडाच्या कथानकावर आधारित आहे. चित्रपटात अनेक दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत.
आर. माधवन रणनीतिक मास्टरमाइंड अजय सान्याल यांच्या भूमिकेत झळकणार आहेत, तर अर्जुन रामपाल धोकादायक ISI मेजर इक्बालच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच संजय दत्त एसपी चौधरी असलम या प्रभावी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आदित्य धर यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी केली आहे.
सद्दामसारखं संपवायला आले अन् स्वतःच अडकले! जनरल जाफरींनी रचलेलं ते ‘चक्रव्यूह’ काय आहे?
‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही हाय-ऑक्टेन स्पाय-अॅक्शन थ्रिलर 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट गुढीपाडवा आणि उगादीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच ईदपूर्वी रिलीज होत असल्याने वीकेंडला मोठी प्रेक्षकसंख्या थिएटरमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अंडरकव्हर एजंटच्या धाडसी मिशनची ही कथा 19 मार्च 2026 रोजी जगभरातील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
