Vinesh Phogat in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मधून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (Olympics 2024) भारताची कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. विनेश फोगटने ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने महिला कुस्ती 50 किलो गटात ऐतिहासिक विजय नोंदवताच, #दंगल सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला आहे.
It’s time for Aamir to make Dangal 2 with Vinesh Phogat as the main lead. pic.twitter.com/lGvayJkEjH
— Aditya Saha (@Adityakrsaha) August 6, 2024
चाहते आता सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) स्टारर 2016 च्या ब्लॉकबस्टर स्पोर्ट्स बायोपिक ‘दंगल’ च्या दुसऱ्या भागाची मागणी करताना दिसत आहे. विनेश फोगटने मंगळवारी 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिची क्युबाची प्रतिस्पर्धी कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. क्यूबन कुस्तीपटूने फोगटला पकडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु तिच्या प्रयत्नांना यश आले नाही. आता विनेश फोगटचा बुधवारी अंतिम फेरीत सामना अमेरिकेच्या सारा ॲनशी होणार आहे.
फोगटच्या विजयानंतर सोशल मीडियावर विनेश फोगटच्या संपूर्ण प्रवासावर सिनेमाची मागणी करण्यात आली. एका वापरकर्त्याने रिओ 2016, टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील विनेशचा एक मॉन्टेज शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “दंगल 2 ची वेळ आली आहे.” तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “ही योग्य वेळ आहे, आमिर खानने विनेश फोगटला मुख्य भूमिकेत घेऊन दंगल 2 बनवावा.” अशा कॉमेंट्स सध्या मिळत आहेत.
Paris Olympics 2024: भारताच्या लेकीची कमाल ! विनेश फोगट फायनलमध्ये, पदकही पक्के
दंगल या चित्रपटातून आमिर खानने चित्रपटगृहात प्रवेश केला तेव्हा त्याच्या चित्रपटानेही इतिहास रचला. आजपर्यंत एकही भारतीय चित्रपट दंगलचा विक्रम मोडू शकलेला नाही. या चित्रपटाने जगभरात 2000 कोटींची कमाई केली होती. आमिरचा दंगल हा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. चित्रपटात आमिर खान, महावीर सिंग फोगट या हौशी कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे, जो आपल्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी या भारतातील पहिल्या जागतिक दर्जाच्या महिला कुस्तीपटू बनण्यासाठी मदत करण्यासाठी पावले उचलतो.
या चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी फोगट बहिणींची भूमिका अतिशय सुरेखपणे साकारली आहे. या चित्रपटात झायरा वसीम, सुहानी भटनागर आणि साक्षी तन्वर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटासाठी आमिर खाननेही अप्रतिम परिवर्तन केले.