Saiyaara Trailer Released : यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांचा ‘सैयारा’ (Saiyaara) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटाचे संगीत आधीच वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम ठरत आहे. यात फहीम-अर्सलान यांचे टायटल ट्रॅक सैयारा, जुबिन नौटियाल यांचे बर्बाद , विशाल मिश्रा यांचे तुम हो तो, सचेत-परंपरा यांचे हमसफर आणि अरिजीत सिंग आणि मिथून यांचे धुन हे गाणे देशभरातील म्युझिक चार्ट्स वर धुमाकूळ घालतात आहेत.
‘सैयारा’ 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरनुसार, अहान पांडे (Ahaan Pandey) ‘सैयारा’ चित्रपटात ‘कृष कपूर’ नावाच्या रॉकस्टारची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री अनिता पद्ढा (Anita Paddha) ‘वाणी’च्या भूमिकेत दिसणार आहे. वाणी क्रिशच्या बँडसाठी गाणी लिहिते. दोघांमध्ये प्रेम सुरू होते, परंतु कथेत ट्विस्ट येतो जेव्हा वाणी एका दृश्यात अहानला चाकूने धमकावताना दिसते.
लोकांच्या प्रतिक्रिया लोक म्हणतात की अहान पांडेने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो इतर ‘नेपोकिड्स’पेक्षा वेगळा दिसतो. एका युजरने लिहिले, “अहानने खरोखर प्रयत्न केला आहे, असे दिसते की तो अभिनय जाणतो.”
दशावतार’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद, अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून भरभरून कौतुक
दुसऱ्याने लिहिले, “अनन्या पांडेच्या भावाच्या अभिनयाकडे पाहून असे वाटते की त्याला त्याच्या अभिनयाच्या आधारे लाँच केले जात आहे, तो एक नेपोकिड आहे म्हणून नाही.” अनेकांनी मोहित सुरीच्या ट्रेलर कटिंग स्किलचे कौतुकही केले. काही जण या चित्रपटाच्या ट्रेलरची तुलना ‘आशिकी २’ आणि ‘एक व्हिलन’ सारख्या चित्रपटांशी करत आहेत.