Aishwarya Rai Birthday: बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai) आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ अभिनयच नाही तर आपल्या सौंदर्यानेही ऐश्वर्याने आपलं नाव कमावलं. 1998 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी ऐश्वर्या आता ग्लोबल आज मोठी स्टार अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूडसोबतच तिने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चनच्या कारकिर्दीबद्दल, नेटवर्थ बद्दल जाणून घेऊ.
1994 मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किबात जिंकला होता. त्यानंतर 2 दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या ऐश्वर्याने अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, याआधी तिने ९वीत शिकत असताना एका जाहिरातीत काम केले होते. ऐश्वर्या पहिल्यांदा इरुवर या तमिळ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर ती बॉबी देओलसोबत और प्यार हो गया मध्ये दिसली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत.
मॉडेलिंगपासून पासून करिअरला सुरूवात
आज ऐश्वर्या इंड्रस्टीतील आघाडीची अभिनेत्री असली तरी तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली होती. त्यावेळी तिला मॉडेलिंग क्षेत्रात 1500 रुपये मिळत होते. ऐश्वर्या जेव्हा आफलं मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावत होती, तेव्हा ती अवघ्या 18 वर्षाची होती.
ऐश्वर्याचं नेटवर्थ
ऐश्वर्या एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 828 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या सुमारे 20 ब्रँडची ब्रँड एंडोर्समेंट आहे. त्यामाध्यमातून ती वर्षाला 100 कोटींपेक्षआ अधिकचे पैसे कमावते. ऐश्वर्या प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी 6 ते 7 कोटी रुपये घेते.
अभिषेक आणि ऐश्वर्याची दुबईतसुध्दा प्रॉपर्टी आहे. बच्चन कुटुंब सध्या ‘जलसा’ या 112 कोटींच्या बंगल्यात राहते. ऐश्वर्याचे बीकेसीमध्ये 5500 स्क्वेअर फुटाचे लक्झरी अपार्टमेंट आहे. ज्याची आज एकूण किंमत 21 कोटी रुपये आहे. याशिवाय, वरळी येथील स्कायलार्क टॉवर्सच्या ३७व्या मजल्यावर ऐश्वर्याचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 41 कोटी रुपये आहे.
ऐश्वर्याने 2004 मध्ये स्वतःचे फाउंडेशनही सुरू केले होते. या फाउंडेशनच्या माध्यमातून ती गरजू लोकांना मदत करते. ऐश्वर्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2009 मध्ये तिला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. तर फ्रान्सने तिला 2012 मध्ये ‘ऑर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं.