Download App

Javed Akhtar : पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Javed Akhtar in Ajanta Ellora International Film Festival : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा (International Film Festival) नुकताच जोरदार थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Padmapani lifetime Achievement Award) त्यावेळी जावेद अख्तर यांनी भविष्यवाणी केली. यावेळी भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिकचं ठरवतील, असं जावेद अख्तर यावेळी म्हणाले.

जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भविष्यवाणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट मनोरंजन सुष्टीला दिले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत चाहते किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ९वे वर्ष: अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कायमच चर्चेत असतो. देशभरातील चित्रपट हे मराठवाड्यातील प्रेक्षकांनपर्यंत पोहोचावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात असते. यंदा अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ९वे वर्ष होते. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Main Atal Hoon: पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ मधील ‘राम धून’ गाण्याचा धमाकेदार टीजर लाँच

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन: या महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सुप्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे. यावेळी मंचावर एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्मसिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी व सर्व सहकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

follow us

वेब स्टोरीज