Download App

औरंगाबादकरांना जगभरातील तब्बल 55 चित्रपट पाहण्याची पर्वणी !

औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये 11 ते 15 जानेवारी 2022 च्या दरम्यान अजंठा-एलोरा इंटरनॅशनल फिल्मफेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील तब्बल 55 चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावर्षीचा अजंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवा चित्रपट महोत्सव आहे.

या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, तसेच या कार्यक्रमाला किशोर कदम, दिग्दर्शक समीर पाटील, गिरीष मोहिते. त्याचबरोबर मधुर भंडारकर, सई ताम्हणकर, श्वेता बसु प्रसाद, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी यांची उपस्थिती असणार आहे. तर ते विद्यार्थ्यांसह संवाद देखील साधणार आहेत. अशी माहिती अजंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक अशोक राणे यांनी दिली.

त्यामुळे आता औरंगाबादकरांना आपल्या शहरात जगभरातील तब्बल 55 चित्रपट पाहण्याची पर्वणी मिळाली आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून तिकीट काढावे लागणार आहे. यासाठी लहान मुलं आणि जेष्ठ नागरिकांना 300 रूपये तर सामान्य नागरिकांना 500 तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

या चित्रपट महोत्सवामध्ये ट्रँगल ऑफ सॅडनेस, औरो की प्रतिभा, महानगर, ऑल अबाउट गर्ल, व्हेरी नाईस डे, ग्लोबल आडगाव, नाईट रायडर, मास्तर क्लास, लेक्चर ओन मॅजिकल रिलीज्म, शिफंग, सुरदिना, द वॉल, इंडिया लोक डाऊन, ऑल द ब्रेथस यासह इतरही चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यासोबतच कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का?, पाखर, लेव्हल, दानपात्र ग्रीनलँड कॉफी या शॉर्टफिल्म महोत्सवा दरम्यान दाखविण्यात येतील.

Tags

follow us