Download App

Ajay Devgan या दिवशी उतरणार ‘मैदाना’मध्ये; अखेर चित्रपटाची रिलीज डेट समोर

Ajay Devgan : अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) याचा गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मैदान ( Maidaan ) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. निर्मात्याकडून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहीम यांचे जीवनावर आधारित आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल टीमने 1951 आणि 1962 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता.

Bade Miyan Chote Miyan चा धडाकेबाज टीझर रिलीज; टायगर-अक्षयच्या ॲक्शनने चाहते थक्क

त्यावेळी या टीममध्ये चुन्नी गोस्वामी, पीके बनर्जी, बलराम, फ्रॅंको और अरुण घोष यांच्यासारखे दिगज खेळाडू सहभागी झाले होते. तर या चित्रपटामध्ये अजय देवगन फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिम यांची भूमिका साकारणार आहे. ज्यामधून रहीम यांचा जीवनपट उलगडून दाखवला जाणार आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्वाची बातमी! यावर्षी परीक्षेचा कालावधी वाढणार

अगोदर हा चित्रपट जून 2023 मध्ये रिलीज होणार होता. मात्र काही कारणांमुळे पुन्हा रिलीज डेट लांबीवर पडली त्यानंतर आता हा चित्रपट एप्रिल 2024 मध्ये ईद च्या दिवशी रिलीज करण्यात येणार आहे. याबद्दल निर्मात्यांकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आले आहे.

दरम्यान मैदानसह अजय देवगनकडे आणखी काही प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे. ज्यामध्ये आर माधवन आणि ज्योतिका यांच्यासोबत त्याचा आगामी चित्रपट येणार आहे. ज्याचं पोस्टर त्याने गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. शैतान असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us

वेब स्टोरीज