Download App

Ajay Devgan च्या शैतानचा टीझर रिलीज; दिड मिनिटांमध्ये आर माधवच्या डायलॉग्जने उडवला थरकाप

Ajay Devgan : अजय देवगन (Ajay Devgan), आर माधवन आणि ज्योतिका यांच्या आगामी शैतान या चित्रपटाचा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट यावर्षी 8 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री ज्योतिका वीस वर्षानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. निर्मात्यांकडून आज 25 जानेवारीला या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. ‘वो पूछेगा तुमसे, एक खेल है, खेलोगे? पर उसके बहकावे में मत आना.’

माझी झोपेतच सही घेतलीयं, दुरुपयोग झाल्यास माझ्याशी गाठ; मनोज जरांगेंचा कडक शब्दांत इशारा

या चित्रपटाचे टीझरबद्दल सांगायचं झालं तर टीझरच्या सुरुवातीलाच अभिनेता आरमाधवनच्या आवाजात संवाद ऐकायला मिळतो. ज्यामध्ये तो म्हणतो की, ‘ये पूरी दुनिया बहरी है। पर सुनते सब मेरी हैं। काले से भी काला मैं, भय का मीठा प्याला मैं, मालिक हूं मैं नौ लोक का। जहर भी मैं, दवा भी मैं, चुपचाप सदियों से देखता एक खामोश गवाह भी मैं। मैं रात हूं, मैं शाम हूं, मैं, मैं तमाम हूं, मैं बनाता, बिगाड़ता, समेटता, मरोड़ता, लोग कहते हैं कि मैं किसी को नहीं छोड़ता। एक खेल है, खेलोगे, एक खेल का बस एक ही नियम है। मैं चाहे कुछ भी कहूं, मेरे बहकावे में मत आना.’

त्यामुळे या थरारक डायलॉगमुळे हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे भीतीयुक्त मनोरंजन करणार एवढं नक्की. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. त्यामध्ये अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिका हे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बेहेल यांनी केलं आहे.

‘आरपीआय’मध्ये गटबाजी उफाळली; निर्णयाचा चेंडू थेट आठवलेंच्या दारी

तर जिओ स्टुडिओ, अजय देवगन फिल्म आणि मनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन आर माधवन आणि ज्योतिका यांच्यासह अभिनेत्री जानकी बोधीवाल चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तरी एक टीझरच्या रिलीजनंतर प्रेक्षकांकडून आर माधवनवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

follow us

वेब स्टोरीज