अजय देवगणच्या ‘चौहान’मधील दमदार लूकची जोरदार चर्चा, 2027 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चौहान चित्रपटाचं शीर्षक जाहीर झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अजय देवगणच्या ‘चौहान’मधील दमदार लूकची जोरदार चर्चा रंगली.

Untitled Design (37)

Untitled Design (37)

Ajay Devgn’s powerful look in ‘Chauhan’ : जिओ स्टुडिओज आणि कलर यलो यांनी नुकताच अजय देवगण अभिनीत भव्य अॅक्शनपट ‘चौहान’ ची घोषणा केली असून, हा चित्रपट 2027 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. शीर्षक जाहीर झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अजय देवगणच्या ‘चौहान’मधील दमदार लूकची जोरदार चर्चा रंगली. अनेक चाहत्यांनी याला ते वाट पाहत असलेल्या ‘ओरिजिनल अॅक्शन स्टार’चे पुनरागमन असल्याचे म्हटले आहे.

‘चौहान’च्या घोषणा व्हिडिओमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अजय देवगणची दमदार एंट्री. ही एंट्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्याच्या पार्श्वसंगीतावर दाखवण्यात आली होती. या नॉस्टॅल्जिक संदर्भाने चाहत्यांच्या मनाला विशेष भावनिक स्पर्श केला. आता ‘जुम्मा चुम्मा दे दे’चे मूळ आयकॉन असलेल्या अमिताभ बच्चन यांनीही या घोषणा व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आपली पसंती व्यक्त केली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचा भाऊ ठरला सिया-चेतनच्या ओळखीचा दुवा, तपासातून महत्वाची माहिती समोर

व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले,
“टी ५७८३ (i) – अजयच्या कामगिरीचे कौतुक 🙏🏻❤️

#CHAUHAAN येतोय.”

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबतच दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री काजोल आणि अभिषेक बच्चन यांनीही ‘चौहान’च्या टीमला शुभेच्छा देत या दमदार टायटल अनाउन्समेंटला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित मसाला मनोरंजनपटाच्या प्रदर्शनाची उलटगणतीही चित्रपटाइतकीच रोमांचक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि कलर यलो निर्मित ‘चौहान’चे दिग्दर्शन नीरज यादव यांनी केले असून, ज्योती देशपांडे, आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version