‘TDM’ चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Bhaurao Karhade On TDM Marathi Movie : ‘ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने काल कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T115813.218

TDM

Bhaurao Karhade On TDM Marathi Movie : ‘ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने काल कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.

आता यावर विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

भाऊराव कऱ्हाडे नेहमी नवोदित कलाकारांना घेऊन सिनेमा बनवण्याचं धाडस करत असतात. ‘टीडीएम’ (TDM) या सिनेमातील अभिनेता पृथ्वीराज थोरातने देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. तो म्हणाला,”मायबाप प्रेक्षकांना टीडीएम सिनेमा पाहायला आहे. मराठी सिनेमा पुढे यायला हवा. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. या क्षेत्रातील जाणकारांकडून आम्ही काय आदर्श घ्यावा? आम्ही खरचं कामं करावी की नाही. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा हा चित्रपट पाहा आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की कळवा. हात जोडत त्याने चाहत्यांना विनंती केली आहे की,”माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या”.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

‘टीडीएम’ हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण या सिनेमाला शो मिळत नसल्याने दिग्दर्शकासह कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणं हे मुद्दा जुना आहे. आजवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी स्क्रीन मिळण्यासाठी आवाज उठवला आहे. पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.

Exit mobile version