Akanksha Dubey Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) नुकतीच वाराणसीच्या सारनाथ येथील हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. दिवंगत अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी भोजपुरी गायक-निर्माता समर सिंह यांच्यावर आकांक्षा दुबे हत्येचा आरोप करण्यात आला होता. परंतु आता आकांक्षाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे.
सीएम योगींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन
आकांक्षाचे कुटुंबीय वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी एएनआयला सांगितले की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो. वाराणसी पोलिसांवर आता विश्वास नसल्यामुळे आकांक्षाच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आकांक्षाच्या आईच्या म्हणण्यानुसार, गायक समर सिंह आकांक्षाला त्रास देत असे. आकांक्षा यांच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे.
आरोपी गाझियाबाद येथून अटक
आकांक्षा दुबेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आकांक्षाचा अफवा असलेला प्रियकर समर सिंह याला गाझियाबाद येथून यूपी पोलिसांनी अटक केली होती. आकांक्षाच्या मृत्यूनंतर समर आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
समर सिंह दिल्ली सीमेला लागून असलेल्या गाझियाबादच्या नंदग्राम पोलिस स्टेशनच्या राज नगर एक्स्टेंशन भागातील एका हाउसिंग सोसायटीत लपून बसला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समर सिंहला स्थानिक पोलिस आणि वाराणसीच्या पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली.
Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले
मुलीची हत्या केल्याचा आरोप
दुसरीकडे, समर सिंहच्या अटकेनंतर दिवंगत अभिनेत्री आकांक्षाच्या आईने मीडियाला दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करून फाशी देण्यात यावी. आकांक्षाची आई मधु दुबे यांनी सीएम योगींना आवाहन केले होते की, समर सिंह यांच्या घरावर बुलडोझर फिरवा. आरोपींनी मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा आरोप त्यांनी केला.
आकांक्षा दुबेने अनेक चित्रपटांमध्ये काम केले
आकांक्षा दुबे 25 वर्षांची होती. त्यांनी ‘वीरों के वीर’, ‘मेरी जंग मेरा फैसला’, ‘फाइटर किंग’ आणि ‘कसम बदना करने वाले पार्ट 2’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. शूटिंगच्या निमित्ताने ती वाराणसीतील सारनाथलाही गेली होती, पण इथेच तिचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.