Download App

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मोठा निर्णय; तालीम हॉलच्या भाड्यात ५०% सवलत

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या नाटकाची तालीम करण्यात येणार आहे त्या नाटकाच्या संहितेला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे

All India Marathi Theater Council : प्रायोगिक रंगभूमीवरील (Theater) कलाकारांना तसंच, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्याच्या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे यशवंतराव नाट्य संकुल, माटुंगा येथील तालीम हॉलच्या भाड्यात ५०% सवलत देण्यात येणार आहे.

Marathi Theater Council: नाट्यगृहांना येणार अच्छे दिन; CM शिंदेंनी जाहीर केली एक खिडकी योजना

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या नाटकाची तालीम करण्यात येणार आहे त्या नाटकाच्या संहितेला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रायोगिक नाटक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसंच, सदर नाटकात काम करणारे सर्व कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य असणे बंधनकारक आहे.

जास्तीत जास्त संस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे आणि अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

follow us

संबंधित बातम्या