Download App

नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामलेंकडून कांबळींच्या सत्तेचे वस्त्रहरण

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली व निकालही घोषित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी ठरले आहेत.

दामलेंचे वर्चस्व
या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे वर्चस्व असलेले दिसून आले. तसेच या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला. मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10 जागांपैकी 8 जागांवर प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांचा विजय मिळवला आहे. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. यामध्ये प्रसाद कांबळी (Prasad Kambli) आणि सुकन्या कुलकर्णी-मोने (Sukunya Kulkarni Mone) विजयी ठरले आहेत. विशेष म्हणजे मुंबई उपनगरात दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या आहेत तर दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत.

दामलेंचा पॅनल
प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलमध्ये दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे. प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. दरम्यान या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने बाजी देखील मारली आहे.

विजयी उमेदवारांना मिळालेली मते
1) प्रशांत दामले (759)
2) विजय केंकरे (705)
3) विजय गोखले (664)
4) सयाजी शिंदे (634)
5) सुशांत शेलार (623)
6) अजित भुरे (621)
7) सविता मालपेकर (591)
8) वैजयंती आपटे (590)
9) सुकन्या कुलकर्णी-मोने (567)
10) प्रसाद कांबळी (565)

Tags

follow us

वेब स्टोरीज