Download App

Akshay Kumar: वाढदिवशी खिलाडी महाकालच्या चरणी, कुटुंबीयांसह घेतलं दर्शन; Video Viral

Akshay Kumar In Mahakal: मनोरंजन क्षेत्रातील (Entertainment) ‘खिलाडी’ (khiladi) अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने वाढदिवशी महाकालेश्वराचं (Mahakal) दर्शन घेतलं आहे. (Akshay Kumar Visited Mahakal) त्याने पहाटेच्या आरतीचा अनुभव देखील घेतला आहे. भगवी वस्त्रे अंगावर परिधान करत त्याने क्रिकेटपटू शिखर धवनसोबत संपूर्ण कुटूंबानी आरती केली.

खिलाडी व क्रिकेटपटू शिखर धवनने महाकालेश्वराचे आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. भारतीय संघाच्या विजयासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रार्थना केली. दर्शन घेतल्यावर माध्यमांशी बोलत असताना खिलाडी कुमार म्हणाला आहे की, ‘मी देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे”. क्रिकेटर शिखर धवन देखील खिलाडीसोबत भस्म आरतीमध्ये सामील होत महाकालेश्वराची पूजा केल्याचे बघायला मिळत आहे.

खिलाडी याअगोदर देखील उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या दर्शनासाठी गेला होता. तसेच महाकालेश्वराच्या दर्शनाला आल्याचे कळताच चाहत्यांनी आणि भाविकांनी त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी केली होती. भस्म आरतीच्या दरम्यान खिलाडी महाकालेश्वराच्या भक्तीत लीन झाल्याचे बघायला मिळाले आहे. विशेष म्हणेज खिलाडी सहकुटुंब महाकालेश्वराच्या दर्शनाला आला आहे. आरती केल्यावर अभिनेत्याने नंदी हॉलमध्ये देखील पूजा केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी त्याच्याबरोबर मुलगा आरव, सिमर आणि बहीण अलका हिरानंदानी उपस्थित होती. खिलाडीसह त्याच्या मुलाने देखील पारंपारिक पोशाख परिधान केल्याचे बघायला मिळत आहे.

Gashmeer Mahajani: वडिलांच्या निधनानंतर केस न कापण्याबद्दल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, म्हणाला…

तसेच खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) हा सिनेमा गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला होता. एकीकडे ‘गदर 2’, रजनीकांतचा ‘जेलर’हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना ‘ओएमजी 2’ या सिनेमाने देखील जोरदार कमाई केली आहे. रिलीजच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, कथानक, दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टींचं जोरदार कौतुक झाल्याचे बघायला मिळालं आहे. आता अभिनेत्याचा ‘मिशन राणीगंज’ हा सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे.

Tags

follow us