Akshay Kumar Indian Citizenship: खिलाडीला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Akshay Kumar Indian Citizenship: बॉलिवूडचा प्रसिद्ध खिलाडी म्हणजेच चाहत्यांचा लाडका अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खिलाडीकडे याअगोदर कॅनडाचे नागरिकत्व होते. यामुळे त्याला अनेकवेळा चाहत्यांनी ट्रोल केल्याचे बघायला मिळाले होते. परंतु आता खिलाडी भाईला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. याबद्दल सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर करुन खिलाडीने माहिती दिली आहे. […]

Akshay Kumar Post

Akshay Kumar Post

Akshay Kumar Indian Citizenship: बॉलिवूडचा प्रसिद्ध खिलाडी म्हणजेच चाहत्यांचा लाडका अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खिलाडीकडे याअगोदर कॅनडाचे नागरिकत्व होते. यामुळे त्याला अनेकवेळा चाहत्यांनी ट्रोल केल्याचे बघायला मिळाले होते. परंतु आता खिलाडी भाईला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. याबद्दल सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर करुन खिलाडीने माहिती दिली आहे.


खिलाडीने इन्स्टाग्रामवर कागदपत्रांचा फोटो पोस्ट शेअर करत भारताचे नागरिकत्व मिळाल्याची माहिती चाहत्यांना यावेळी दिली आहे. खिलाडीने पोस्टमध्ये सांगितले आहे की, “हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!” खिलाडीच्या या पोस्टला कमेंट करत अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत असल्याचे बघायला मिळत आहे.

खिलाडीचा OMG 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला होता. OMG 2 या सिनेमामध्ये खिलाडीसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. OMG 2 सिनेमाला बॉक्स ऑफिसवर गदर 2 सिनेमासोबत टक्कर होत असल्याचे बघायला मिळत आहे.

Bigg Boss OTT 2चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक; एल्विश यादव रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास!

OMG 2 सिनेमानंतर खिलाडी ‘सोरारई पोटरू’या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये बघायला मिळणार आहे. हा सिनेमा १ सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात खिलाडीसोबत राधिका मदन आणि परेश रावल मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

Exit mobile version