Download App

बॉलिवूडचा खिलाडी कुमारने केली आगामी सिनेमाची घोषणा; ‘Sky Force’ मध्ये दिसणार नव्या भूमिकेत

Sky Force Release Date: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar Movie), बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार अशी त्याची ओळख आहे. मागच्या वर्षी आलेल्या अक्षयच्या सिनेमानी फारशी कामगिरी केली नसली तरी त्याने आपल्या मानधनात कोणतीही कमतरता केलेली नाही. जसा तो सर्वाधिक मानधन घेण्यासाठी ओळखला जातो तसा तो सर्वाधिक कर भरणारा देशातील एकमेव अभिनेता म्हणून ओळखला जातो.


नुकतंच त्याने यावर गांधी जयंतीनिमित्त (Gandhi Jayanti 2023) अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ (Sky Force) सिनेमाची घोषणा केली आहे.खिलाडी कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2024 दिवशी गांधी जयंतीनिमित्त सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची घोषणा करत अभिनेत्याने या सिनेमाचा टीझर देखील सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळाले आहे.

खिलाडी कुमारने सोशल मीडियावर ‘स्काय फोर्स’ सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा देशाच्या पहिल्या हवाई युद्धावर आधारित असणार आहे. या सिनेमात खिलाडी कुमार हवाई दलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना बघायला मिळणार आहे. टीझर शेअर करत अभिनेत्याने सांगितले आहे की,”आज गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त संपूर्ण देश जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय घोषणा दिल्या आहेत.

Kangana Ranaut: बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगनाच्या ‘तेजस’चा दमदार टीझर पाहिलात का?

खिलाडी, मोहरा, संघर्ष, हेरा फेरी, अजनबी, हां मैने भी प्यार किया, अंदाज, खाकी, मुझसे शादी करोगी, फिर हेरा-फेरी, गरम मसाला, नमस्ते लन्दन, भूल-भुल्लैया, वेलकम, हे बेबी, सिंह इज किंग, हाउसफुल, राऊडी राठौड, ओह माई गॉड, देसी बॉयज, हॉलीडे, बेबी, गब्बर इस बेक, एयरलिफ्ट, जॉली एलएलबी, रुस्तम, टॉयलेट एक प्रेम कथा, पेडमैन, या सिनेमातून खिलाडी कुमारने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

Tags

follow us