Hardik Joshi: राणाने पाठकबाईंला किस केलं अन्…; फोटो व्हायरल…

Hardik Joshi: हार्दिक जोशी (Hardik Joshi) म्हणजेच सर्व चाहत्यांचा राणादा आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) म्हणजेच सर्व चाहत्यांची पाठकबाईं त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करत असल्याचे दिसून येत आहेत. राणादा सध्या त्याच्या कामामध्ये खूपच व्यस्त असलयाचे चित्र दिसून येत आहे. तर पाठक बाई देखील तिच्या सुखी संसारामध्ये चांगलीच रमल्याचे दिसत आहे.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 13T150750.474

Hardik Joshi

Hardik Joshi: हार्दिक जोशी (Hardik Joshi) म्हणजेच सर्व चाहत्यांचा राणादा आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) म्हणजेच सर्व चाहत्यांची पाठकबाईं त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करत असल्याचे दिसून येत आहेत. राणादा सध्या त्याच्या कामामध्ये खूपच व्यस्त असलयाचे चित्र दिसून येत आहे. तर पाठक बाई देखील तिच्या सुखी संसारामध्ये चांगलीच रमल्याचे दिसत आहे.


राणादा व पाठकबाईं या जोडप्याची सध्या सोशल मीडियावर तर सर्वाधिक चर्चा रंगत आहे. दोघंही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो (Romantic photos) सोशल मीडियावर (Social media) शेअर करताना असल्याचे दिसतात. आताही राणादाने पाठकबाईंसोबत शेअर केलेला फोटो खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. पाठकबाईंचा आज वाढदिवस आहे. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस तिच्यासाठी अगदी खास राहणार आहे.

सोशल मीडियाद्वारे पाठकबाईंला तिचे चाहते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बऱ्याच कलाकार मंडळींनी देखील पाठकबाईंसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर (Post Share ) केल्या आहेत. राणाद नेही त्याच्या बायकोला एका वेगळ्या अंदाजामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kiran Gaikwad: ‘चौक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? किरण गायकवाडच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

राणादाने पाठकबाईंसाठी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. राणाने पाठकबाईंसोबतचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, ‘माझ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात गोडवा आला आहे. राणाच्या या पोस्टवर पाठकबाईंने देखील कमेंट केली आहे. ती म्हणाली, ‘बेस्ट फ्रेंड खूप आभार’. नवऱ्यासोबतच राणा पाठकबाईंचा चांगला मित्र देखील आहे.

राणाने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तो पाठकबाईंला किस करत असल्याचे दिसून येत आहे. बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा… असे राणाने दुसरा फोटो शेअर करत सांगितले आहे. या दोघांच्या या फोटोची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. तर राणाने किस करताच पाठकबाईंही अगदी आनंदी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version