यश राज फिल्म्सच्या धमाकेदार अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘ऐल्फा ’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी दिसणार खऱ्या अर्थाने ‘ऐल्फा’ अवतारत!

ट्रेलर दोन धाडसी आणि घातक तरुणींची रोमांचक ओरिजिन स्टोरी एका भन्नाट पॉपकॉर्न अ‍ॅक्शन एंटरटेनरच्या रूपात प्रेक्षकांसमोर आणतो.

Untitled Design (2)

Untitled Design (2)

Alia Bhatt and Sharvari will be seen in a true-blue ‘Alpha’ avatar! : यश राज फिल्म्सने आलिया भट्ट आणि शर्वरी प्रमुख भूमिकेत असलेल्या बहुप्रतीक्षित ‘ऐल्फा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर दोन धाडसी आणि घातक तरुणींची रोमांचक ओरिजिन स्टोरी एका भन्नाट पॉपकॉर्न अ‍ॅक्शन एंटरटेनरच्या रूपात प्रेक्षकांसमोर आणतो. या ट्रेलरमध्ये बॉबी देओल यांच्या पात्राची अधिक झलक पाहायला मिळते. ते आलिया भट्टच्या पात्राचे कठोर मार्गदर्शक आहेत. आलिया एका अशा प्रशिक्षित महिला असॅसिनची भूमिका साकारत आहे, जिला लहानपणापासून मारण्यासाठी घडवण्यात आले आहे.

पुढे जाऊन ती आपल्या गुरूच्याच विरोधात उभी ठाकते आणि त्याच्याशी थेट संघर्ष करते. ट्रेलरमध्ये अनिल कपूर यांचीही झलक पाहायला मिळते आणि त्यांचा संबंध रहस्यमय ‘ऐल्फा प्रोग्राम’ शी असल्याचे संकेत दिले जातात. हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन, स्टायलिश दृश्यरचना आणि रोमांचकारी प्रवासाचे आश्वासन देणारा ‘ऐल्फा’ हा एक परिपूर्ण मनोरंजनपट म्हणून समोर येतो, जो आलिया आणि शर्वरी यांच्या निर्भय ‘ऐल्फा अ‍ॅटिट्यूड’चा उत्सव साजरा करतो.

सहा खासदार फुटले, आता संजय राऊतांच्या मांडीला-मांडी लावून बसलेला खासदार देखील फुटणार?

चित्रपटातील शर्वरीच्या पात्राविषयी ट्रेलरमध्ये जाणूनबुजून अधिक माहिती देण्यात आलेली नाही, कारण कथेत तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र ट्रेलरमध्ये ती बॉबी देओल यांना कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी आलियासोबत हातमिळवणी करत असल्याचे संकेत मिळतात. ऐल्फा च्या स्टायलिश आणि कूल दृश्यांना अधिक प्रभावी बनवणारा त्याचा दमदार बॅकग्राउंड स्कोरही विशेष लक्ष वेधून घेतो. जागतिक स्तरावरील लोकप्रिय डीजे ह्यूगल (HUGEL) यांचा सुपरहिट ट्रॅक ‘जमैकन बाम बाम’ (Jamaican Bam Bam) ट्रेलरमध्ये वापरण्यात आला आहे.

या ट्रॅकमुळे ट्रेलरमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहात अनुभवायला मिळणाऱ्या अॅड्रेनालिन रशची झलक मिळते. शिव रवैल दिग्दर्शित ‘अल्फा’ हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version