Allu Arjun’s ‘Raka’ creates history enters Guinness World Records for special achievement : अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित ‘राका’ या चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अॅटली दिग्दर्शित आणि सन पिक्चर्स निर्मित या चित्रपटाने “रिअल टाइममध्ये सर्वाधिक लोकांचे मोशन-कॅप्चर” या विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. एका सिंगल सेशनमध्ये तब्बल 37 कलाकारांचे एकाच वेळी रिअल टाइममध्ये मोशन-कॅप्चर करण्यात आले.
साहिल वाकोडे प्रकरणात आयआयटी बॉम्बेने मागितली माफी, म्हणाले त्याच्या कॉपीबद्दल तपासापूर्वी सांगणे…
भारतीय सिनेमाच्या दृष्टीने ही तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.‘राका’च्या निर्मितीमागील मोठी व्याप्ती, महत्त्वाकांक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता या विक्रमातून अधोरेखित झाली आहे. या कामगिरीमुळे भारतीय चित्रपट निर्मितीने जागतिक स्तरावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
