Download App

Ameesha Patel: विक्रम भट्टसोबतच्या अफेअरबद्दल अमीषाला अजूनही होतोय पश्चाताप; म्हणाली, “माझं करिअर…”

Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) सध्या ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा सकिनाच्या भूमिकेत चाहत्यांना दिसली आहे. अमिषाने नुकतेच या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Director Anil Sharma) यांच्या कंपनीवर निशाणा साधला असून आता तिने विक्रम भट्टसोबतच्या (Vikram Bhatt) नात्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. अमिषा पटेल म्हणाली की, तिला आज देखील एका विवाहित दिग्दर्शकाला डेट केल्याचा मोठा पश्चाताप होत आहे. ते नाते सार्वजनिक करणे तिच्या कारकिर्दीसाठी घातक ठरले आहे.


अमिषा पटेलने नुकतेच एका मुलाखतीमध्ये विक्रम भट्टसोबतच्या आणि तुच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. म्हणाली,  विक्रम भट्टसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमीषाने लंडनमधील बिझनेसमॅन कनव पुरी यांना डेट करायला सुरुवात केली होती. परंतु त्याच्या बरोबरचेही नाते फार काळ टिकू शकले नाही. तसेच अमिषा पुढे म्हणाली की, ‘जर तुम्ही या इंडस्ट्रीत प्रामाणिक असाल तर त्याला इथे स्थान नाही. आणि मी खूप प्रामाणिक राहिले, कारण माझ्यासाठी आयुष्यमध्ये चांगले आणि वाईट हे दिवस येऊन गेले आहेत. माझ्यासोबतही तुम्हाला तेच पाहायला मिळालं आहे.


मी अशा प्रकारची व्यक्ती आहे, जिच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण काही माहिती आहे. मला वाटते ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता आहे. माझ्या आयुष्यात फक्त दोनच संबंध होते, जे सार्वजनिक झाले आणि त्यांच्यामुळे माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. गेल्या 12-13 वर्षे मी कशी आहे हे मलाच माहिती आहे. परंतु आता माझ्या आयुष्यात मला आता कोणताही पुरुष नकोय. फक्त मला शांतता हवी आहे. मला आता आयुष्यामध्ये दुसरे काही नको आहे. तसेच अमिषा पटेल पुढे सांगितले आहे की, बॉलीवूडमध्ये मुलीसाठी अविवाहित राहणे खूप अवघड आहे. एकच अभिनेत्री नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते. आणि काही लोकांमध्ये आधीपासून एखाद्याला डेट केलेल्या किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्या नायिकांबद्दल पूर्वकल्पना असते.

अमिषा पुढे म्हणाली, ‘मुलीचं सिंगल स्टेटस नेहमीच त्या लोकांना आकर्षित करत असते. ज्यांच्यासोबत तुम्ही काम करता असता. तो प्रेक्षकांनाही आकर्षित करतो. जर तुम्ही सिंगल असाल किंवा एखाद्या सुपरस्टारला डेट करत असाल तर त्याचा तुमच्या करिअरला फायदा होईल, असे त्यांना वाटते. अन्यथा,त्या नात्यांची चर्चा केली जाते.  तसेच अमिषा पटेल पुढे म्हणाली, ‘एक नायिका हिरोला डेट करू शकते आणि त्याच्यासोबत चित्रपट करू शकते. त्याला आणखी कामही मिळू शकते. परंतु माझ्या बाबतीत तसं नव्हतं. त्यामुळे ते माझ्या करिअरसाठी घातक ठरलं आहे. पण तुम्ही या चुकांमधून खूप काही शिकता.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

अमिषा पटेल आणि विक्रम भट्ट ५ वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अमिषाच्या आधी विक्रम भट्ट सुष्मिता सेनला डेट करत होते. सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्ट आत्महत्येचा विचार करू लागले होते. परंतु त्याचवेळी विक्रम भट्टच्या आयुष्यात अमिषा आली. तेव्हा विक्रम भट्टचे लग्न झाले होते. विक्रम भट्ट यांनी नंतर अमिषासोबतच्या ब्रेकअपवर एका मुलाखतीत सांगितले की, स्टारडमपासून खाली पडलेल्या अभिनेत्रीचे दुःख ते समजू शकतात. तसेच त्यांनी अमिषाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

Tags

follow us