Download App

Amitabh Bachchan यांना या आधीही झाली होती दुखापत, वाचा किस्सा…

मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जखमी हे एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग करत होते.

पण अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर देखील कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते जखमी झाले होते. त्यावेळी देखील अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग करताना ते जखमी झाले होते. त्यावेळी झालं असं होत. 26 जुलै 1982 ला कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन जखमी झाले होते.

एका अ‍ॅक्शन सीन दरम्यान मार्शल आर्टमध्ये निपुण पुनीत इस्सर यांनी जोरदार ठोसा मारला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन खाली कोसळले. काही वेळानंतर ते उठले मनमोहन देसाई यांनी त्यांना तात्काळ तेथून हलवले. डॉक्टर देखील आले. मात्र त्यांना त्यांच्या आजाराचं निदान झालं नाही.

तेव्हा वेल्लोरचे डॉ. भट्ट यांनी एक्स-रे अहवालात आतड्यात छिद्र असल्याचे आढळून आले आणि सांगितले की, अमिताभ यांच्या पोटाला झालेली दुखापतीत आता पू होण्याचा शक्यता आहे. त्यानंतर अमिताभ यांची इमरजन्सी सर्जरी करण्यात आली. 2 ऑगस्ट 1982 ला उपचारांनंतर त्यांची तब्बेत हळुहळू सुधारली.

Amitabh Bachchan यांना दुखापत, हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान घडली घटना

त्यानंतर आता पुन्हा हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान आपण जखमी झाल्याची माहिती अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतः दिली. त्यांनी ब्लॉगवरून ही माहिती दिली. त्यांनी यामध्ये लिहीले की, ‘बरगडीच्या स्नायू फाटला आहे. शूटिंग रद्द करण्यात आले आहे. त्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खूप त्रास होतोय. हालचाल करण्यात अडचण येते. श्वास घेण्यासही त्रास होतो. मला या दुखण्यावर काही औषधे दिली आहेत. बरे होण्यासाठी काही आठवडे लागतील.’ असं ते म्हणाले. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडिने मुंबईला पाठवण्यात आले आहे. आता ते आपल्या घरी आराम घेत आहेत.

Tags

follow us