Amruta Khanvilkar’s cryptic post amidst divorce rumors says love often gets lost : नुकतच मराठी चित्रपट सृष्टीतून अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोट घेतल्याचं बातमी आली होती. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील घटस्फोट आपल्याला काही नवे नाहीत. पण आता मराठी कलाकारांकडूनही एका मागे एक विभक्त होण्याचे निर्णय घेतले जात आहेत. त्यात आता मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशु मल्होत्रा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात आता अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून अमृताने या चर्चांना खतपाणी घातलं आहे असं वाटत आहे.
अमृता खानविलकरची पोस्ट नेमकी काय?
अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी मध्ये एक कोट शेअर केला आहे. खलील जिब्रान यांचा तो कोट आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, आपण काय बोलतो आणि आपल्याला काय म्हणायचं असतं आणि आपल्याला काय सांगायचं असतं आणि आपण काय बोलतो यामध्ये बऱ्याचदा प्रेम हरवून जातं. याचा अर्थ थेट तिच्या आणि तिचा पती हिमांशु मल्होत्राच्या टस्फोट घेणार असल्याच्या चर्चांशी जोडले जात आहे.
‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवर माफी मागण्यासाठी काँग्रेसला संजय काकडेंचा 24 तासांचा अल्टिमेटम
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि चाहत्यांची आवडती जोडी असलेल्या आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी अखेर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. जवळपास 15 वर्षांचा वैवाहिक प्रवास संपवत दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची माहिती सोशल मीडियावरील संयुक्त पोस्टद्वारे दिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र त्यावर आदिनाथ किंवा उर्मिला यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
