Anant & Radhika Engagement: सुनेच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानींने केला हटके डान्स

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची एंगेजमेंट (Engagement) झाली. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनाच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानी यांनी सरप्राईज डान्स देखील केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटचे फोटो […]

Untitled Design (18)

Untitled Design (18)

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची एंगेजमेंट (Engagement) झाली. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनाच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानी यांनी सरप्राईज डान्स देखील केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.

अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांची आज एंगेजमेंट झाली. दोघांच्या एंगेजमेंट सोहळ्याचे पहिले फोटोही समोर आले आहेत. राधिका मर्चंटने एंगेजमेंटसाठी गोल्डन लेहेंगा घातला होता. तर अनंत अंबानी यांनी निळ्या रंगाचा पोशाख निवडला. अनंत अंबानी यांच्या आई नीता अंबानी यांनीही एंगेजमेंट फंक्शनमध्ये सरप्राईज परफॉर्मन्स दिला.

दोन्ही कुटुंबांनी 2019 मध्ये अनंत आणि राधिकाचे लग्न होणार असल्याची घोषणा केली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटचे पहिले फोटो, प्रत्येक चित्रात सासू नीता अंबानी सुनेचा हात धरताना दिसत होती. मुकेश अंबानी यांच्या आलिशान बंगल्यातील अँटिलिया येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले.

सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
अनंतच्या एंगेजमेंट सोहळ्याला त्याचे काका अनिल अंबानी आणि काकू टीना अंबानीही पोहोचले होते. दोघेही पारंपरिक ड्रेसमध्येच दिसले. यासोबतच अनेक स्पोर्ट्स आणि बॉलिवूड स्टार्सनेही सहभाग घेतला होता. यामध्ये सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, श्रेया घोषाल यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता.

अनंत-राधिका हे बालपणीचे मित्र
राधिका आणि अनंत हे बालपणीचे मित्र आहेत. अनंतने अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून तो जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचा सदस्य म्हणून काम करत आहे. तर राधिका मर्चंट सध्या एनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळावर आहे. राधिकाने मुंबईतील श्री निभा आर्ट डान्स अकादमीचे गुरु भवन ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

Exit mobile version