Download App

Animal च्या लाटेवर भाजप स्वार; ‘या’ गाण्यावर बनवला मोदींचा खास व्हिडीओ…

Animal : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अ‍ॅनिमल’ (Animal ) हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सगळीकडे या सिनेमाचा बोलबाला बघायला मिळत आहे. ( Box Office Collection) या सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जण सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. त्यात या चित्रपटाच्या लाटेवर स्वार होत भाजपने देखील चित्रपटातील एका गाण्यावर पंतप्रधान मोदी यांचा रिल बनवण्यात आला आहे.

अर्जन व्हॅली गाण्यावर मोदींचा स्वॅग…

भाजपकडून होणारा सोशल मिडीयाचा वापर आणि पंतप्रधान मोदी यांचं कॅम्पेमनिंग नेहमीटच लक्षवेधी आणि आकर्षक असंत. यावेळी देखील त्यांनी ‘अ‍ॅनिमल’ या रणबीर कपूरच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत असलेल्या चित्रपटाच्या ‘अर्जन व्हॅली’ गाण्यावर पंतप्रधान मोदी यांचा रिल बनवण्यात आला आहे. भाजपच्या अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या आठवणींना विद्या बालनने दिला उजाळा, पोस्ट शेअर करत म्हणाली…

यामध्ये मोदींचा प्रधान सेवक असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांमध्ये त्याचे फायटर प्लेन तेजसमध्ये बसले होते. ते दृश्य दाखवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या रॅलिंचे काही फुटेज यामध्ये आहेत. संसदेचं उद्धाटन, सैन्याच्या जवानांना दिलेली भेट, आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या भेटींचे फुटेड वापरले आहे. त्यात मोदींना ग्लोबल लिडर म्हटले आहे. तर व्हिडीओच्या शेवटी नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत असं म्हटलं आहे.

आव्हाड आणि परांजपे यांना शरद पवारांनी राजीनाम्यानंतर काय सांगितलं?

अॅनिमलबद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित (Sandeep Reddy Vanga) ‘अॅनिमल’ सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आहे. ‘Sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘ॲनिमल’ नं आगाऊ बूकिंग द्वारे 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सगळ्यात जास्त या सिनेमानं एनसीआरमध्ये कमाई केली. पहिल्या दिवशी सिनेमागृहातील गर्दी विषयी सांगायचं झालं तर हा 62.47 टक्के थिएटर फूल होते. तर नाइट शोज 84.07 टक्के थिएटर भरलं होतं.

Tags

follow us