Sandeep Vanga Reddy: चित्रपट निर्माते संदीप वंगा रेड्डी (Sandeep Vanga Reddy) त्यांच्या ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड खळबळ उडवून दिली. रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) या चित्रपटात काम केल्यानंतर संदीप वंगा रेड्डी यांनी आता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने सांगितले की, शाहरुखला ‘ॲनिमल’ चित्रपटाचा टीझर आवडला होता.
एका दिलेल्या मुलाखतीत संदीपला विचारण्यात आले होते की, त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? यावर संदीप म्हणाले होते की, “मला शाहरुख खान सरांसोबत काम करायचे आहे. प्रत्येक नायकासाठी काही कल्पना असेल. हिंदीत मला शाहरुख खान सर आणि रणवीर सिंगसोबत काम करायचे आहे.
संदीप वंगा यांना विचारण्यात आले की, याबाबत शाहरुख खानशी बोलले का? यावर तो म्हणाला की, “नाही, मी त्याच्याशी याबद्दल बोललो नाही, परंतु मी त्यांना भेटलो आहे. आम्ही याबद्दल बोललो नाही, त्याने टीझर पाहिला आणि त्याला टीझर आवडला. मी त्याला ऑफिसमध्ये टीझर दाखवला, तो गणपतीच्या वेळी आला होता.
शाहरुखने नकारात्मक भूमिकेवर विधान: शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, जर त्याने नकारात्मक भूमिका केली तर त्याचे परिणाम त्याच्या पात्राला भोगावे लागतील याची काळजी घेईन. यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तो ‘ॲनिमल’बद्दल बोलत असल्याचा अंदाज लावला. की जर तो खलनायकाची भूमिका करत असेल, तर पात्राला त्याचे परिणाम भोगावे लागतील याची तो काळजी घेईल.
‘लूप लपेटा’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! ‘ताहिर राज भसीनने शेअर केली भावनिक पोस्ट
काही इंटरनेट वापरकर्त्यांचा असा अंदाज आहे की, हा ॲनिमल चित्रपटाचा संदर्भ असू शकतो. यावर किंग खान म्हणाला की, “मी आशावादी आणि आनंदी कथा सांगणारी व्यक्ती आहे. मी ज्या नायकांची भूमिका करतो ते चांगल्या गोष्टी करतात, ते आशा आणि आनंद देतात. जर मी एखाद्या वाईट माणसाची भूमिका केली तर मी खात्री करतो की त्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे. कारण माझा विश्वास आहे की चांगले चांगले जन्माला येते. आणि माझा विश्वास आहे की वाईटाला बाहेर काढले पाहिजे. लोकांना स्वप्न पाहण्याची हिंमत देणाऱ्या प्रामाणिक भूमिका मला साकाराचे आहे, असे यावेळी दिग्दर्शकाने स्पष्ट केले आहे.