Download App

जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट; “अंत्याआरंभ” नोव्हेंबर महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

एफटीआय पुणे येथून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः आजवर बनवले आहेत.

  • Written By: Last Updated:

Antyaarambh Movie : किरणमयी आर कामथ निर्मित “अंत्यआरंभ” हा नवीन कोकणी चित्रपत (Movie) लवकारच प्रेक्षाकांच्य भेटीस येणार अहे. या चित्रपाटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून, ह्याचं लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन सुप्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केलं आहे.

ग्लोबल स्टार राम चरण बॉक्स ऑफिसवर करणार धमाका, गेम चेंजर संक्रांतीला प्रदर्शित होणार

एफटीआय पुणे येथून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः आजवर बनवले आहेत. “अंत्यआरंभ” हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवत असते असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ.रमेश कामठ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ, विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

फिरोज नाडियाडवाला आणि इरोस यांच्यातील वाद मिटला, हेरी फेरी चित्रपटाचे राईट्स विकत घेतले

कॅमेरामन पीव्हीआर स्वामी, संगीत सुप्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचं आहे. संवाद लेखन कृष्ण राव ह्यांचं आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रीकरण झालं असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

follow us

संबंधित बातम्या