Download App

Tiger Nageshwar Rao: ‘या अनोख्या कथेचा एक भाग..’, अनुपम खेर यांनी सांगितलं यामागचं गुपित

Tiger Nageshwar Rao: बॉलिवूडमधील (Bollywood) एक जेष्ठ अभिनेते म्हणून अनुपम खेर यांना ओळखले जाते. आजवर त्यांनी 500 पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारले आहेत. सध्या अनुपम खेर (Anupam Kher) हे रवी तेजाच्या(Ravi Teja) ‘टायगर नागेश्वर राव’मध्ये (Tiger Nageshwar Rao) आयबी अधिकाऱ्याची भूमिकेत आहेत. या सिनेमासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.


बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतही अनुपम खेर स्वतःचा दबदबा निर्माण करत आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दल एक गुपित सांगितलं आहे. जेव्हा मी कथा ऐकली आणि सिनेमाची ऑफर दिली, तेव्हा मी वामसीसोबतच्या या अनोख्या कथेचा एक महत्वाचा भाग बनण्यास उत्सुक होतो. रवी तेजाने भारतातील सर्वात मोठा चोर, टायगर नागेश्वर राव यांची भूमिका साकारली आहे, मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडणार आहे. अभिषेकसोबत काम करणे खरच विशेष होते. टायगर नागेश्वर राव प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असणार आहेत.

तसेच या सिनेमात बॉलिवूड स्टार्स देखील दिसणार आहेत. या सिनेमात नुपूर सेनन मुख्य भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे. टायगर नागेश्वर राव हा सिनेमा एका प्रसिद्ध चोराचा बायोपिक आहे. या सिनेमामध्ये रवी तेजाची वेगळी व्यक्तिरेखा बघायला मिळणार आहे. सिनेमातील त्याची देहबोली, बोलण्याची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत सर्व काही वेगळे असणार आहे.

Jacqueline Fernandez Post: गणपत’साठी जॅकलिन फर्नांडिसचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “सिनेमाची…’

सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यावर लोकांची सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या सिनेमाच्या टीझरला जॉन अब्राहमने आपला आवाज देण्यात आला आहे. जॉन अब्राहमचा दमदार आवाज या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये ऐकायला मिळणार आहे. रवी तेजा व्यतिरिक्त प्रवीण दाचाराम, रेणू देसाई, मांडवा साई कुमार आणि राजीव कुमार अनेजा या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

हा सिनेमा 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात 5 सुपरस्टार, तेलगूमधील व्यंकटेश, कन्नडमधील शिवा राजकुमार, हिंदीतील जॉन अब्राहम, तामिळमधील कार्ती आणि मल्याळममधील दुल्कर सलमान हे एकत्र येत आहेत. रवी तेजा टायगर नागेश्वर रावची भूमिका साकारणार आहे.

Tags

follow us