Download App

Anupam Kher: अनुपम खेर साकारणार महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका

Anupam Kher:  बॉलीवूड मधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे आजही हिंदी चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. अनुपम खेर यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने अनेक चित्रपट अजरामर केलेले आहेत. जेवढे ते अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत,(Bollywood) तेवढेच ते एक व्यक्ती म्हणून सुद्धा अनेकांना भावतात. त्यामुळे अनुपम खेर यांचे अनेक चाहते आहेत.अनुपम खेर यांनी आजपर्यंत 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. लवकरच त्यांचा 538 वा चित्रपट चाहत्यांचा भेटीला येणार आहे.


याबद्दलची माहिती खुद्द अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर (social media) पोस्ट शेअर करत दिली आहे. खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 538 व्या चित्रपटांमधील त्यांच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत ते लिहितात की, ‘गुरुदेवांना पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मिळाले हे माझे भाग्य आहे. या चित्रपटाबद्दलची अधिक माहिती लवकरच तुमच्या सोबत शेअर करेल. फोटो वरून लक्षात येत आहे की अनुपम खेर हे मोठ्या पडद्यावर रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारत आहेत. त्यांनी या पोस्टला रवींद्रनाथ टागोर हा हॅशटॅग दिलेला आहे. अनुपम खेर यांच्या रवींद्रनाथ टागोर या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

अनुपम खेर साकारत असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमुळे अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी या चित्रपटाची वाट बघत असल्याची कमेंट केली आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘एम.एस.धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनीचा बायोपिक आहे. यामध्ये त्यांनी धोनींचे वडील ही मुख्य भूमिका साकारली, ज्यासाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

2019 मध्ये खेर यांनी ‘द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ या राजकीय चरित्रात्मक नाटकात भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका पार पाडली. 2022 मध्ये खेर यांनी मिथुन चक्रवर्ती सह विवेक अग्निहोत्रीचा वादग्रस्त चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ मध्ये अभिने केला, जो 1990 मध्ये कश्मीरी पंडितांच्या नरसमहारावर आधारित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाच चित्रपट समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले.

Tags

follow us