Anurag Kashyap: नवाझुद्दीन अन् विकीसोबत सिनेमा बनवणार नाही? स्वत: अनुराग यांनी सांगितले खरं कारण…

Anurag Kashyap: अनुराग कश्यप हा मनोरंजन क्षेत्रातील एक पप्रथितयश दिग्दर्शक आहे. त्याच्या सिनेमाचा चाहतावर्ग देखील चांगलाच मोठा आहे. अनुरागच्या सिनेमाना मिळणारा प्रतिसाद देखील कायम तुफानच असतो. अनुरागने मनोरंजनसृष्टीला एक अनोखं वळण दिल्याचे देखील बघायला मिळत असते. यासोबतच त्यानं कित्येक नवोदित कलाकारांना देखील संधी दिली आहे.   View this post on Instagram   A post shared […]

Anurag Kashyap

Anurag Kashyap

Anurag Kashyap: अनुराग कश्यप हा मनोरंजन क्षेत्रातील एक पप्रथितयश दिग्दर्शक आहे. त्याच्या सिनेमाचा चाहतावर्ग देखील चांगलाच मोठा आहे. अनुरागच्या सिनेमाना मिळणारा प्रतिसाद देखील कायम तुफानच असतो. अनुरागने मनोरंजनसृष्टीला एक अनोखं वळण दिल्याचे देखील बघायला मिळत असते. यासोबतच त्यानं कित्येक नवोदित कलाकारांना देखील संधी दिली आहे.


अभिनेते तंत्रज्ञ तसेच इतर काही लोकांचं करिअर रुळावर आणण्यात अनुरागचा मोठा वाटा आहे. यापैकीची दोन महत्त्वाची नावं म्हणजे नवाजुद्दीन सिद्धिकी आणि विक्की कौशल.नुकतंच एका मुलाखतीत अनुरागने या दोघांविषयी एक धक्कादायक भाष्य केले आहे. पुढील काळात अनुराग या दोघांसोबत काम करू शकणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. अनुरागने या पाठीमागचे कारणं देखील सांगितले आहे. त्याच्या या वक्तव्याने अनेक लोकांचे लक्ष वेधले आहे.

एका दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला की, “मला कोणत्याही कलाकारासोबत काम करायची भीती नाहीये, परंतु सध्याच्या घडीला नवाजुद्दीन आणि विक्की कौशल यांना त्यांचं मानधन देणं शक्य नाही. ते आता मोठे स्टार झाले आहेत आणि आपसूकच त्यांचे मानधन देखील वाढलं आहे. माझ्या सिनेमाचे बजेट खूप कमी असते. यामुळे माझे फारसे नुकसान होत नाही, परंतु त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Chandramukhi 2: खिळवून ठेवणारा थरार अन् कंगना रणौतचं जबदस्त लूक; बहुचर्चित ‘चंद्रमुखी २’चा ट्रेलर प्रदर्शित

तसेच पुढे अनुराग म्हणाला की, “विकी किंवा नवाजुद्दीन हे दोघे देखील माझ्या मैत्रीखातर माझ्या सिनेमात कोणतंही मानधन न घेता काम करतील त्यात काय विषय नाही. परंतु मला ते योग्य वाटणार नाही. त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्यावर कायम राहणार आहे. अनेकवेळा या दोघांनी माझ्या सिनेमात काम करत असताना अनेकदा तडजोड केल्याचे मी स्वतः पाहिले आहे. विकीने तर एकही रुपया न घेता माझ्याकडे काम करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु आता ते शक्य नाही आणि मला त्यांचा गैरफायदा देखील घ्यायचा नाही.

Exit mobile version