Download App

‘Oppenheimer’ सिनेमातील दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; अनुराग ठाकूर यांचे कठोर कारवाईचे निर्देश

Anurag Thakur On Oppenheimer Movie : ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड (Hollywood) सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिलीजअगोदर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे सांगितले जात आहेत. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यासंदर्भात CBFC सदस्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हणाले आहे की, ‘ओपनहाइमर’ या सिनेमात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं एक दृश्य आहे. शारीरिक संबंधांदरम्यान भगवद्गीता वाचतानाचं एक दृश्य सिनेमात दाखवण्यात आले आहे आहे. ‘भगवद्गीता’ हा हिंदू धर्मातील प्रवित्र ग्रंथांपैकी एक आहे. शारीरिक संबंधांदरम्यान भगवद्गीता वाचणं म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केल्यासारखे आहे. आपण कोणत्या जगात जगत आहोत.

 

एजन्सी, मीडिया, राजकारण आणि तुमची हॉलिवूड इंडस्ट्री ही कुराण आणि इस्लामसंदर्भातील कोणत्या गोष्टीचं चित्रण ते दुखावले जाणार  अशा पद्धतीचं करत नसल्याचे यावेळी त्यांनी सुनावले आहे . परंतु हिंदू धर्माच्या बाबतीत ही गोष्ट का लागू होत नाही. तुमच्या सिने-निर्मितीचं देशात सर्वत्र कौतुक होत आहे. आमचा विश्वास आहे की, तुम्ही जर सिनेमातील हे वादग्रस्त दृश्य काढून टाकलं तर एक संवेदनशील माणूस म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच अब्जावधी हिंदूंच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. याकडे तुम्ही दुलर्क्ष केले तर आवश्यक ती कारवाई करावी लागले”.

‘ओपनहाइमर’ या सिनेमात इंटिमेट सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन होत असल्याचं पाहून चाहतेदेखील भडकल्याचे दिसून येत आहेत. या सीनबद्दल सोशल मीडियावर नाराजीचा सूर बघायला मिळत असल्याचे चित्र आहे. सिनेमातील हे दृश्य कायम ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवरही (CBFC) टीका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ‘ओपेनहायमर’ हा हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर असलेल्या या सिनेमाची देशभरात सिनेप्रेमींना उत्सुकता लागली होती. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित हा सिनेमा २१ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us