Anushka Sharmaच्या बाईक सवारीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

Anushka Sharma: महानायक बिग बी यांच्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ( Anushka Sharma) बाइक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी (Big B) यांनी अनोळखी व्यक्तीच्या दुचाकी स्वराला मदत मागितली होती. (Video Viral) याप्रमाणे जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. (mumbai police) […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T111452.835

Anushka Sharma

Anushka Sharma: महानायक बिग बी यांच्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ( Anushka Sharma) बाइक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी (Big B) यांनी अनोळखी व्यक्तीच्या दुचाकी स्वराला मदत मागितली होती. (Video Viral) याप्रमाणे जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. (mumbai police) यावेळी अनुष्का शर्माने आपल्या बॉडीगार्डबरोबर बाईकने प्रवास केला आहे.

अनुष्काचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताच, तिच्यावर टिकेची झोड सुरु झाली. अभिनेत्री डबिंग स्टुडिओमध्ये कामासाठी आली होती. परंतु जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. या वेळी अनुष्काने बॉडीगार्ड सोनूची मदत घेत बाईकने प्रवास केला आहे. परंतु तिचा हा व्हिडीओवर व्हायरल होताच, चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

अभिनेत्री अनुष्का शर्माचा व्हायरल व्हिडीओत बॉडीगार्डबरोबर विनाहेल्मेट प्रवास करत असल्याचे दिसून आली आहे. यामुळे या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत असताना चाहत्यांनी तिला वाहतुकीचे नियम सांगायला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर काही जणांनी थेट मुंबई  पोलिसांना टॅग करत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील केली आहे.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

या व्हायरल व्हिडीओला अनेक यूजरने जोरदार कॉमेंट्स देखील केले आहेत, एका युजरने लिहिले आहे की, या दोघांनी हेल्मेट कुठे घातले आहे? मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्याला पाहिजे, दुसऱ्या एका युजरने म्हंटले आहे की इतर वेळी ही आपल्याला ज्ञान वाटत असते, परंतु आज स्वत: हेल्मेटशिवाय प्रवास करत आहे. तसेच लवकरच ‘चकदा एक्स्प्रेस’ या सिनेमामधून अनुष्का शर्मा चाहत्यांना लवकरच भेटीला येणार आहे.

Exit mobile version