Anushka Shetty : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडा यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे आता बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी देखील लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री वयाच्या 44 व्या वर्षी संसार थाटण्यास सज्ज झाली आहे.
‘बाहुबली’ चित्रपटानंतर, या अभिनेत्रीचे नाव तिचा सहकलाकार प्रभास याच्याशी जोडले गेले होते. या दोघांनीही आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप द्यावे, अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. मात्र, प्रभास आणि अनुष्का (Anushka Shetty) या दोघांनीही नंतर या अफवांचे खंडन केले आणि आपण केवळ ‘चांगले मित्र’ आहोत, असे स्पष्ट केले. तर आता पुन्हा एकदा अनुष्का शेट्टीच्या लग्नाविषयीच्या चर्चा जोराने सुरु आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अनुष्काचा होणारा जोडीदार एक व्यावसायिक आहे आणि विशेष म्हणजे तो त्यांच्या कुटुंबाचा जुना मित्रही आहे. याव्यतिरिक्त, त्याच्याबद्दल अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. अनुष्का शेट्टीने स्वतःही तिच्या लग्नाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. मात्र तिच्या लग्नाच्या बातमीने अनेक चाहत्यांची मने दुखावली आहेत कारण चाहत्यांनी ‘देवसेनेला’ नेहमीच ‘बाहुबली’च्या जोडीने पाहण्याचे स्वप्न पाहिले होते.
Ali Larijani : इराणला सर्वात मोठा धक्का, सुरक्षा प्रमुख अली लारिजानी इस्त्रायली हल्ल्यात ठार
कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अनुष्का शेवटची 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घाटी’ (Ghaati) या चित्रपटात दिसली होती. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तिने अनेक गाजलेले आणि अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. तरीही, ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘देवसेना’ या भूमिकेमुळेच तिला खरी ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या ती बऱ्याच काळापासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आहे.
