RHTDM 2: 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ (Rehna Hai Tere Dil Mein) सिनेमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. आर माधवन (R Madhavan), दिया मिर्झा (Dia Mirza) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी केली नाही, परंतु प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. RHTDM या शॉर्टफॉर्मने सिनेमा लोकप्रिय झाला. याच सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिया आणि माधवन यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. (Dia Mirza R Madhavan starrer Rehna Hai Tere Dil Mein Movie Sequel)
23 वर्षांत एकदाच दिया-मॅडी एकत्र
चित्रटगृहात जाऊन प्रेक्षकांनी ‘रहना है तेरे दिल में’ (Rehna Hai Tere Dil Mein) पाहिला नसल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन दिसतं. मात्र टीव्हीवर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमावर भरभरुन उड्या पडल्या. त्यानंतर आर माधवन आणि दिया मिर्झाच्या चाहत्यांमध्येही क्रेझ झाली. दिया-माधवन यांचं करिअर या सिनेमामुळे आकारास आल्याचे पाहायला मिळाले. 23 वर्षांच्या काळात दोघं एकाही सिनेमात पुन्हा एकत्र झळकले नाहीत. मात्र माधवन अनेकदा इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं स्मरणरंजन करताना पाहायला मिळत असतो. आता ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल भेटीला येणार आहे.
दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न
आघाडीची अभिनेत्री कृती सॅनन ‘रहना है तेरे दिल मे’च्या सिक्वेलमध्ये दिया मिर्झाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. सिनेमाचे मूळ निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानीच सिनेमाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहे. आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांनाच सिनेमाच्या सिक्वेलमध्ये घेण्याची जॅकीची इच्छा होती. वीस वर्षांनंतरची कथा दाखवण्याचा त्याचा प्लॅन होता. जॅकी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास गेल्या वर्षभरापासून या प्रोजेक्टवर काम करत आहे. मात्र तिघांना पुन्हा एकत्र आणण्याचा त्याचा प्लॅन यशस्वी होत नव्हता. त्यामुळे जॅकीने ही योजना ड्रॉप केली आणि नवी कहाणी पडद्यावर साकारण्याचा काम हाती घेतला.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात R Madhavan ची जादू; 7000 लोकांनी दिलं अनोखं त्रिब्युट!
वासू भगनानींच्या लेकाचा ड्रीम प्रोजेक्ट
सूत्रांच्या माहितीनुसार कृती सॅननची निवड पक्की झाली आहे. तर दोघा अभिनेत्यांची निवड होणं अद्याप बाकी आहे. मात्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांना विचारणा केली जात असल्याची चर्चा आहे.