Article 370 Vs Crakk Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर (Box Office) चित्रपटांची टक्कर ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही अनेक चित्रपट एकाच वेळी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. कधी चित्रपट चांगले चालतात तर कधी त्याचा फटका एखाद्याला सहन करावा लागतो. या मालिकेत पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) ‘आर्टिकल 370’ (Article 370) आणि दुसरा विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’ (Crack: Jeetega To Jeega) अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर नेमकी कोणाची जादू प्रेक्षकांना आवडते हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.
यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले आहे. या चित्रपटातील यामीच्या अभिनयाचे खूप तोंडभरून कौतुक होत आहे. अशा परिस्थितीत हा तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरू शकतो, असे मानले जात आहे. सध्या अशी चर्चा सुरु आहे की हा चित्रपट 6-8 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईसह ओपन करू शकतो. त्याच्या ऍडव्हान्स बुकिंगच्या अहवालाबाबत, असे म्हटले जात आहे हा सिनेमा नक्कीच धुमाकूळ घालणार आहे.
‘आर्टिकल 370’मुळे ‘क्रॅक’ची कमाई कमी होऊ शकते: विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल स्टारर ‘क्रॅक’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून दोन स्टार्सची जोडी पहिल्यांदाच समोरासमोर दिसणार आहे. त्याच्या ॲक्शन सीक्वेन्स आणि स्टंटला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. मात्र, चित्रपटाच्या कमाईबद्दल, रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की पहिल्या दिवशीची कमाई ‘आर्टिकल 370’ पेक्षा कमी असू शकते. विद्युत जामवालचा चित्रपट 2-3 कोटींची ओपनिंग करू शकतो.
Shiv Thakare ED Notice : बिग बॉस’च्या शिव ठाकरेला ‘ईडी’चे समन्स!…
‘आर्टिकल 370’ आणि ‘क्रॅक’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे विशेष. यामीचा हा चित्रपट एक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे, जो एका सत्य घटनेवर आधारित आहे. तर, विद्युत जामवालचा चित्रपट स्पोर्ट्स थ्रिलर आहे. त्यात दमदार ॲक्शन आणि स्टंट पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर दोघांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षक कोणावर जास्त प्रेम करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पॉलिटिकल थ्रिलर फिल्म किंवा स्पोर्ट्स थ्रिलर याची पहिल्यांदाच ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे.