PM Modi On Article 370: यामी गौतम (Yami Gautam) स्टारर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) 23 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘आर्टिकल 370’ हा एक राजकीय नाटक आहे. काश्मीरमधील घटनेतील 370 कलम हटवताना सरकारला किती संघर्ष करावा लागला, यावर या सिनेमाची कथा आधारित आहे. या चित्रपटात यामीने एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहिली जात होती. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे.
‘आर्टिकल 370’ चित्रपटावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया: जम्मूतील मौलाना आझाद स्टेडियममध्ये झालेल्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले, “मी ऐकले आहे की या आठवड्यात ‘आर्टिकल 370’ रिलीज होणार आहे, जम्मूच्या जनतेची जय जय कार संपूर्ण देशात ऐकू येणार आहे. हा कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे, माहित नाही पण कालच मी टीव्हीवर ऐकले की असा चित्रपट ‘आर्टिकल 370’ वर येतोय. लोकांना योग्य माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे चांगले आहे. हे विधान चित्रपटाच्या रिलीजपूर्वीचं पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कतरिना कैफच्या ब्युटी ब्रँडने महिला प्रीमियर लीग यूपी वॉरिअर्ससोबत केलं अनोखं कॉलब्रेशन
यामी गौतमनेही पीएम मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया: अभिनेत्री यामी गौतमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पीएम मोदींच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पीएम मोदींना ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाबद्दल दिलेल्या शब्दांसाठी आभार मानले आहेत. यासोबत यामीने लिहिले की, “पंतप्रधान मोदींना आमच्या चित्रपटाबद्दल बोलताना पाहणे अभिमानास्पद होते. मला आणि माझ्या टीमला खरोखर आशा आहे की ही अविश्वसनीय कथा पडद्यावर आणण्यासाठी आम्ही तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त मेहनत घेतली आहे.
‘आर्टिकल 370’ स्टार कास्ट आणि कथा: यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370’ मध्ये प्रियमणी आणि अरुण गोविल देखील मुख्य भूमिकेत आहेत. कलम 370 रद्द करणे किंवा कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकणे याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात यामी एका बुद्धिमान अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे. ‘आर्टिकल 370’ची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केली आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी म्हणजेच आज जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.