Asha Bhosle Net Worth : अबुधाबी, दुबई, बहरीनसह ‘या’ शहरात रेस्टॉरंट; आशा भोसले यांची एकूण संपत्ती किती?

Asha Bhosle Net Worth : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं 28 एप्रिल रोजी दुपारी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Asha Bhosle Net Worth

Asha Bhosle Net Worth

Asha Bhosle Net Worth : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं 28 एप्रिल रोजी दुपारी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 11 एप्रिलच्या रात्री दाखल करण्यात आला होता मात्र त्यांच्यावर सुरु असणाऱ्या उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांनी मराठी भाषेसह विविध भाषेत 12 हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहे. तर दुसरीकडे आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातसह व्यावसायिक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी ‘आशाज’ (Asha’s) नावाची एक जागतिक रेस्टॉरंट साखळी तयार केली होती.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबी (Abu Dhabi), दुबई (Dubai) , बहरीन (Bahrain) , कुवेत (Kuwait) , इंग्लंडसह युनायटेड किंगडमच्या इतर देशात आशा भोसले यांचे रेस्टॉरंट आहे. विविध देशात असणाऱ्या व्यवसायमुळे 2026 मध्ये आशा भोसले यांची संपत्ती सुमारे १०० कोटी असल्याचा दावा माध्यमांमध्ये करण्यात येत आहे. एका अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत 10 महिला गायकांमध्ये आशा भोसले यांचा समावेश होतो. तर दुसरीकडे काही अहवालानुसार त्यांची संपत्ती 200 ते 250 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. मुंबई आणि पुण्यात त्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता असून यामध्ये पेडर रोडवरील त्यांचे निवासस्थान ‘प्रभु कुंज’ याचा देखील समावेश आहे. अहवालानुसार, त्यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्यच फक्त 80 ते 100 कोटी इतके आहे.

करंजीत भाजपची भव्य शक्तिप्रदर्शन रॅली; अक्षय कर्डिलेंच्या विजयासाठी निर्धार

वयाच्या 10 व्या वर्षी आशा भोसले यांनी 1943 मध्ये मराठी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले. यानंतर त्यांनी हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहे. 2011 आशा भोसले यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदले गेले. 2008 आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2000 आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात आले. 1997 आशा भोसले या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. तर 1949 मध्ये त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले होते मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही.

Exit mobile version