Ashish Warang Death : हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज 05 सप्टेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास ठाणे, वर्तक नगर, येथे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आतापर्यंत निधनाचे नेमके कारण समोर आलेलं नाही. आशिष वारंग अभिनेता रणवीर सिंहसोबत सूर्यवंशी या चित्रपटामध्ये दिसले होते.
Heartbreaking news for the film industry. Actor Ashish Warang has passed away. He was a familiar face in Hindi cinema, starring in films like #Sooryavanshi, #Drishyam, and #Mardaani, as well as many Marathi and South Indian movies. #RIPAshishWarang pic.twitter.com/8DYuCSFpZg
— Amit Karn (@amitkarn99) September 5, 2025
सिंबा, सूर्यवंशी, दृश्यम, एक व्हिलन रिटर्न्स, मेरी प्यारी बिंदू, हिरोपंती, बॉंबे, सर्कस, मर्दानी या सारख्या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. तर तांडव आणि धर्मवीर सारख्या मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची एक वेगळी छाप सोडली होती.