Amruta Subhash : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींने चित्रपटांच्या इंटिमेट सीन शूट करतानाचे अनुभव शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना आलेले काही त्रासादायक अनुबव देखील अनेकींनी सांगितलेले आहेत. त्यातच आता मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील आपला सेक्रेड गेममध्ये इंटिमेट सीन शूट करतानाचा एक अनुभव शेअर केला आहे. तिच्या या खुलाश्याने सर्व अश्चर्य व्यक्त करत आहे. ( Ask her about Menstrual cycle dates Amruta Subhash expose about sacred Games intimate seen shoot )
‘मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष, माझ्याकडे किती आमदार लवकरच कळेल’; पवारांनी ठणकावलं!
सध्या अमृता सुभाष कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित लस्ट स्टोरीज 2 मुळे चर्चेत आली आहे. तर सेक्रेड गेममध्ये इंटिमेट सीन शूट करतानाचा एक अनुभव शेअर करताना अमृता म्हणाली की, अनुराग कश्यपच्या सीरीजच्या तिच्या पहिल्या इंटिमेट सीन शूट करताना दिग्दर्शकाच्या टीमने मला माझ्या मासिक पाळीच्या तारखा विचारल्या होत्या. पाळीच्या वेळी महिलांना त्रास होतो. त्यामुळे इंटिमेट सीन सहज शूट करता यावे. यासाठी माझ्याकडे ही चौकशी करण्यात आली होती.
सेवा विकास बॅंकेतील 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अमर मूलचंदानीला ईडीकडून अटक
पुढे अमृता म्हणाली की, सेक्रेड गेम्स 2 मध्ये मी माझा पहिला इंटिमेट सीन शूट करत होते. या सीरीजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले ते माझ्या कम्फर्टचा पुर्ण विचार करत होते. त्यामुळे मला या इंटिमेट सीन सहज शूट करता आले. त्यांची टीम खुप चांगली आहे. मला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मला माझ्या सोयीनुसार इंटिमेट सीन सहज शूट करता येतील असं पाहिलं.
सेक्रेड गेम्स 2 मध्ये अमृता सुभाषने रॉ एजंटची भूमिका साकारली होती. या सीरीजचे दोन्हीही भाग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. यामध्ये अमृता सुभाषसह नवाजुद्दीन सिद्दिकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली होती. तर या सीरीजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे.