Asur 2 Review : केसर भारद्वाज की शुभ जोशी, खरा सिरीयल किलर कोण? खिवळून ठेवणारा ‘असूर-2’

Asur 2 : ‘असुर’च्या पहिल्या सीझनची कथा ज्या ठिकाणी संपते, तिथूनच दुसऱ्या सीझनच्या (Asur 2) कथेची सुरुवात करण्यात आली आहे. ‘असूर’च्या शेवटी शुभ जोशी तुरुंगात जात असल्याचे यामध्ये दिसून आले होते. त्यावेळी त्याचे वय देखील कमी दाखवले होते. पण आता मोठा झाल्यावर तो बदला घेण्यासाठी परत आला आहे. शुभने मोठा झाल्यावर राक्षस (असुर) व्हायचं ठरवले […]

Asur 2 Review

Asur 2 Review

Asur 2 : ‘असुर’च्या पहिल्या सीझनची कथा ज्या ठिकाणी संपते, तिथूनच दुसऱ्या सीझनच्या (Asur 2) कथेची सुरुवात करण्यात आली आहे. ‘असूर’च्या शेवटी शुभ जोशी तुरुंगात जात असल्याचे यामध्ये दिसून आले होते. त्यावेळी त्याचे वय देखील कमी दाखवले होते. पण आता मोठा झाल्यावर तो बदला घेण्यासाठी परत आला आहे. शुभने मोठा झाल्यावर राक्षस (असुर) व्हायचं ठरवले असते. (Varun sobti) त्यामुळे आता तो कसा याचा बदला घेत आहे, हे ‘असुर 2’मध्ये चाहत्यांना बघायला मिळणार आहे. जियो सिनेमावर प्रेक्षकांना मोफत ही सिरीज पाहता येणार आहे.

शुभच्या वागणुकीमध्ये झालेला हा मोठा बदल बघून धनंजय राजपूत म्हणजेच अर्शद वारसीला मोठा धक्का बसतो. आता धनंजय राजपूत आणि निखिल नायर (वरुण सोबती) शुभला रोखू शकतील का? याचं उत्तर चाहत्यांना सीरिजमध्ये मिळणार आहे. ‘असुर’च्या पहिल्या सीझनमध्ये चांगलं आणि वाईट या दोन्ही मधील युद्ध दाखवण्यात आले आहे. तर आता दुसऱ्या सीझनमध्ये हे युद्ध किती प्रमाणात शिगेला पोहोचलेलं बघायला मिळणार आहे.

शुभ जोशी हा सीरियल किलर आहे. त्याचा भारतीय पौराणिक कथांवर खूप मोठा विश्वास आहे. महायुद्ध करण्याची त्याची मोठी इच्छा आहे. पण आता सीबीआय आणि फॉरेन्सिक तज्ञ म्हणजे धनंजय कपूर आणि निखिल नायर या असुरला पकडू शकणार का? त्यांना त्याचा प्लॅन कळेल का? हे चाहत्यांना सीरिजमध्ये कळणार आहे. ‘असुर’चा पहिला सीझन संपल्यानंतर खरा असुर कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांची मोठी उत्सुकता वाढली होती.

आता असुर नक्की कोण आणि त्याचं काय होणार या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांना मिळणार आहे. धनंजय राजपूत आणि निखिल नायर हे खटल्याच्या दरम्यान अनेक मोठ्या अडचणींचा सामना करत असताना दिसणार आहेत. ‘असुर’मधील प्रत्येक पात्र अनेक संकटाचा सामना करत असल्याचे सीरिजमध्ये बघायला मिळत आहे. केसर भारद्वाज की शुभ जोशी? खरा सिरीयल किलर कोण?

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

‘असुर 2’ या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा ओनी सेनने सांभाळली आहे. या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. पहिल्या सीझनपेक्षा दुसऱ्या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट दाखवण्यात आले आहेत. अरशद वारसी आणि वरुण सोबती ही जोडी ‘असुर 2’मध्ये चाहत्यांना बघायला मिळाला आहे. धनंजय राजपूतच्या भूमिकेत अरशद वारसी आहे. तर फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या भूमिकेत वरुण सोबती. रिद्धी डोगरा, अनुप्रिया गोएंका आणि शुभ गिल यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना थक्क केलं आहे.

Exit mobile version