Download App

Video : सैफवर हल्ला करणारा संशयित ताब्यात; आरोपीने शाहरूखच्या घराची रेकी केल्याची माहिती

  • Written By: Last Updated:

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असतानाच एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर (Saif Ali Khan) हल्ला करणाऱ्या आरोपीने बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) घराचीही रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी बांद्रा येथून एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळ्यास असून, त्याची चौकशी केली जात आहे. (Suspect detained by police for questioning in Saif Ali Khan attack case)

पतीवरच्या हल्ल्यानंतर अभिनेत्री करिनाची पहिली पोस्ट; मीडिया अन् पापाराझींना केलं ‘हे’ आवाहन

जारी केलेला फोटो आणि ताब्यातील आरोपीचा चेहरा मिळता जुळता

पोलिसांनी काल (दि.16) आरोपीचा फोटो जारी केला होता. त्यानंतर आज एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, ताब्यात घेण्यात आलेल्या आणि पोलिसांनी जारी केलेल्या आरोपीचा चेहरा काहीसा मिळता जुळता आहे. परंतु हा आरोपी सैफवर हल्ला करणाराच आहे का? याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाहीये.

सैफवर हल्ल्यापूर्वी शाहरूखच्या घराची केली रेकी?

सैफ अली खानवर हल्ल्याची घटना होऊन जवळपास 32 तासांनंतर अखेर एका संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, दुसरीकडे आरोपीने सैफवर हल्ला करण्यापूर्वी शाहरूख खानच्या ‘मन्नत’ या घराचीदेखील रेकी केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली असून, सैफशिवाय शाहरूखदेखील आरोपीच्या निशाण्यावर होता का? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

सलमान खानपासून ते सैफ अली खानपर्यंत… ‘हे’ बॉलिवूड स्टार्स ठरले अपहरण आणि हल्ल्यांचे बळी

सैफच्या मणक्यातून काढला हेक्स ब्लेडचा तुकडा

सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात सर्जरी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी सैफच्या शरिरातून अडीच इंचाचा हेस्क ब्लेडचा तुकडा बाहेर काढला आहे. सर्जरीनंतर सैफला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

Video : … आता मात्र भीती वाटायला लागलीये; सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेचं विधान चर्चेत

तपासासाठी 35 पथके  

सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून संशयीत हल्लखोर बांद्रा रेल्वे स्थानक परिसरात दिसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथके पालघर जिल्ह्यातील वसई नालासोपारा आणि इतर ठिकाणी रवाना करण्यात आली होती. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांकडून 35 पथक तयार करण्यात आली होती. ज्यात 15 मुंबई क्राइंम ब्रँच आणि 20 मुंबई लोकल पोलिसांच्या सामावेश होता.

follow us